Pune Market Price: पुण्यात कांद्याचे दर घसरले; वाढलेल्या आवकेचा परिणाम

अवकाळी पावसाच्या भीतीने बाजारात मोठी आवक; भाजीपाल्याचे दर 10 ते 20 टक्क्यांनी कमी
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात पाठविण्यास सुरुवात केल्याने कांद्याची आवक वाढली आहे. रविवारी बाजारात 125 ट्रकमधून विक्रीसाठी कांदा दाखल झाला. मागील आठवड्याच्या तुलनेत यामध्ये तब्बल 25 ट्रकने वाढ झाली. परिणामी, गत आठवड्यात 9 ते 12 रुपये असलेले किलोचे दर रविवारी दोन ते तीन रुपयांनी उतरून 6 ते 10 रुपयांवर पोहचले.

Onion
Pune Fruit Market Rates: उन्हामुळे पुण्यात फळांची मागणी वाढली; कलिंगड, लिंबाचे दर तेजीत

राज्यासह परराज्यांतील बटाट्याचा हंगाम सुरू झाल्याने बटाट्याबरोबरच भेंडी, गवार आणि शेवग्याची आवकही वाढली आहे. परिणामी, या सर्व भाज्यांच्या दरात सुमारे दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. स्थानिक मटारचा हंगाम संपल्यामुळे त्याची आवक घटली असून, परराज्यातून होणारी आवकही मागणीच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. त्यामुळे मटारच्या दरात वाढ झाली आहे. तर, इतर फळभाज्यांच्या बाबतीत मागणी आणि पुरवठा, यामध्ये समतोल राहिल्याने त्यांच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत विशेष बदल झाला नसल्याचे व्यापारीवर्गाकडून नमूद करण्यात आले.

Onion
Pune Grocery Market Rates: पुण्यात किराणा बाजारात मंदी; गुळाचे दर वाढले, खाद्यतेल स्वस्त

घाऊक बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून रविवारी (दि. 19) 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 5 टेम्पो, इंदूर येथून गाजर 6 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, भुईमूग शेंग गुजरात आणि कर्नाटक येथून प्रत्येकी 2 ते 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून वाटाणा 2 टेम्पो, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो, तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 40 टेम्पो इतकी आवक झाली.

Onion
Chakan Market Rates: चाकण बाजारात मोठी आवक; तरीही भाजीपाला दर कडाडले

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 7 टेम्पो, गवार 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 5 टेम्पो, मटार 125 ते 150 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, भुईमूग 50 गोणी, घेवडा 3 ते 4 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, कांदा सुमारे 125 टेम्पो इतकी आवक झाल्याची माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Onion
Pune Fish Price: पुण्यात मासळीचे दर तेजीत; कमी आवकामुळे भाव वाढले

शेपू, मुळा आणि राजगिराच्या भावात घट; चुका महागला

आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे मार्केट यार्डात शेपूच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 3 रुपये, मुळे आणि राजगिराच्या भावात प्रत्येकी 1 रुपयाने घट झाली आहे. तर, केवळ चुकाच्या भावात जुडीमागे 2 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील मार्केट यार्डात रविवारी (दि. 19) कोथिंबिरीची 90 हजार जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मेथीची आवक वाढली आहे. मागील आठवड्यात 35 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज 60 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. घाऊक बाजारात कोथिंबिरीला जुडीनुसार 10 ते 20 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news