Pune : झाडे जगवण्यावरून अधिकारी फैलावर : जिल्हाधिकारी संतापले

Pune : झाडे जगवण्यावरून अधिकारी फैलावर : जिल्हाधिकारी संतापले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रावेतमधील मतदान यंत्रासाठीच्या गोदामाच्या ठिकाणी झाडे तोडून बांधकाम करण्यात येत असल्याने मनसेने विरोध दर्शवला आहे. जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत झाडे जगवण्याची मागणीही केली आहे. त्यावर एका अधिकार्‍याने झाडे कसे जगवणार, असा प्रश्न केल्यावर त्या अधिकार्‍याला कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडे जगली पाहिजेत म्हणत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी चांगलेच फैलावर घेतले.

जिल्हा प्रशासनाकडून रावेतमधील साडेतीन एकर जागेत मतदान यंत्रांसाठी गोदाम बांधण्यात येत आहे. पीएमआरडीएने मेट्रो इको पार्कसाठी दिलेल्या सुमारे आठ एकरच्या जागेत हे गोदाम उभे राहत आहे. गोदामाच्या उर्वरित जागेत नागरिकांनी लावलेली झाडे जगवण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना व मेट्रो इको पार्क कृती बचाव समितीच्या शिष्टमंडळाला दिले. उर्वरित झाडांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यात येईल. झाडांसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

मेट्रो इको पार्कमध्ये 250 प्रजातींची झाडे

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामासाठी अनेक झाडे तोडण्यात आली. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात इतर ठिकाणी झाडे लावण्यासाठी पीएमआरडीएने रावेतमध्ये आठ एकर जागा दिली. त्या ठिकाणी 'मेट्रो इको पार्क' करण्याचे ठरले. पार्कमध्ये 250 प्रजातींची सुमारे एक हजार झाडे आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने मतदान यंत्रे ठेवण्यासाठी गोदाम बांधण्याच्या सूचना दिल्या. आठ एकरांपैकी सुमारे साडेतीन एकर जागेत मतदान यंत्रांसाठी गोदाम बांधण्याचे ठरले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news