Pune October Heat: पुण्यात सप्टेंबरअखेरीसच ‘ऑक्टोबर हीट’; दिवसाबरोबर रात्रीचाही उकाडा वाढला

कमाल तापमान ३०-३१ अंशांच्या आसपास; लोहगाव, मगरपट्टा, कोरेगाव पार्कमध्ये किमान तापमान २४ अंशांपुढे
Heatwave
HeatwavePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील कमाल तसेच किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याने सप्टेंबरअखेरीसच ऑक्टोबर हीटची चाहूल लागली आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या उकाड्यातही वाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Heatwave
Pune Municipal Corporation Employees: पुणे महापालिकेतील ४०३ कर्मचाऱ्यांचा सेवासमावेश पुन्हा ऐरणीवर!

अगदी सकाळी नऊ-दहा वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवू लागल्याने ऐन पावसाळ्यानंतरच पंखे आणि वातानुकूलित यंत्रणांचा वापर वाढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदले जात आहे.

Heatwave
Pune Ganeshotsav Mandap: गणेशोत्सव संपून पाच दिवस; तरीही रस्त्यांवर मांडव अन् रथ कायम!

त्याच वेळी काही भागांमध्ये किमान तापमान २४ अंशांच्या पुढे गेल्याने रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत आहे. विशेषतः लोहगाव, मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क परिसरात किमान तापमान तुलनेने अधिक नोंदले गेले आहे.

Heatwave
Pune IT Jobs: पुण्यातील IT क्षेत्रासाठी गुड न्यूज! अमेरिकन कंपन्यांच्या भागीदारीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार

पुणे शहरात कमाल तापमान ३० अंश, तर किमान तापमान २० अंश नोंदले गेले. पाषाण येथे ३० आणि २०.७ अंश, लोहगाव येथे ३१ आणि २४.१ अंश, चिंचवड येथे ३१ आणि २१.९ अंश, लवळे येथे ३१ आणि २३ अंश तापमान नोंदले गेले. मगरपट्टा येथे कमाल ३०, तर किमान २४.१ अंश तापमान होते. कोरेगाव पार्क येथे कमाल ३१ अंश तापमानाची नोंद झाली.

Heatwave
Nilesh Ghaywal Mocca Case: मोक्का प्रकरणात नीलेश घायवळसह सहा आरोपी निर्दोष

शहरात आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज

शहराच्या विविध भागांतील तापमानात असलेली तफावतही नागरिकांच्या जाणिवेत भर घालत आहे. काँक्रीटचे वाढते क्षेत्र, वाहनांची वर्दळ आणि दुपारपर्यंत वाढणारी उन्हाची तीव्रता यामुळे शहरातील उष्णतेचा परिणाम अधिक जाणवत आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.१) शहरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता असली, तरी ऑक्टोबरच्या सुरुवातीला उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news