Pune News : रस्ते खोदले… काम पूर्ण होणार कधी?

Pune News : रस्ते खोदले… काम पूर्ण होणार कधी?

बिबवेवाडी : येथील अप्पर डेपो परिसरात महापालिकेकडून रस्ते विकासाचे काम संथगतीने सुरू आहे. गेले दोन महिन्यांपूर्वी पीएमपी डेपो शेजारी रस्त्याची खोदाई केली आहे. तसेच चैत्रबन झोपडपट्टी ते अप्पर डेपो कामगार चौकापर्यंत अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडी आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अप्पर डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ रस्ता खोदल्यामुळे बसला आत-बाहेर जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. महापालिका व महावितरण कंपनीतील समन्वयाच्या अभावामुळे परिसरातील रस्त्यांची कामे रखडत आहेत. परिणामी, या रस्त्यांच्या कामांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. पथविभाग, विद्युत विभाग व महावितरण कंपनी यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने ही कामे दिवसेंदिवस रेंगाळत चालली आहेत.

हे काम तातडीने सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक संघ व नागरिकांनी दिला आहे. माजी नगरसेवक बाळा ओसवाल म्हणाले की, अप्पर डेपो परिसरात गेले अनेक दिवसांपासून रस्ता खोदून ठेवलेला आहे. यामुळे वाहनचालक, नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेणे
गरजेचे आहे.

अप्पर डेपो परिसरातील रस्ता खोदला आहे; पण कामगार चौकात अनेक विद्युतवाहिन्या काढण्यासाठी महावितरण कंपनीशी पत्रव्यवहार सुरू आहे. महापालिकेचे विद्युत विभागाकडे याबाबत अधिक माहिती मिळेल.

-अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका.

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणार्‍या उच्चदाबाच्या विद्युतवाहिनी व खांब काढण्याबाबत महापालिकेकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे पत्र आले नाही. यााबाबतचे पत्र आल्यास त्वरित विद्युतवाहिन्या व खांब काढण्यात येतील.

– राजेश बिजवे, कार्यकारी अभियंता, महावितरण, पद्मावती कार्यालय.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news