डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही : अजित पवार | पुढारी

डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही : अजित पवार

पुणे : ऑनलाईन डेस्क : राज्यात आरक्षणाबाबत मराठा आणि ओबीसी वाद शिगेला पोहचलेला असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. जेव्हा राज्याला गरज आहे तेव्हाच अचानक अजित पवारांना डेंग्यू झाला, हा खरच डेंग्यूच आहे की राजकिय संसर्गजन्य डेंग्यू आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवार डेंग्यू झाल्याचं कारण देत पळवाटा तर काढत नाही आहे ना? असा सुद्धा सूर ऐकायला मिळत होता. पण या सगळ्यां चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मौनच होते. आज मात्र पुणे दौऱ्यावर असतांना अजित पवार यांनी मौन सोडलं आणि आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये त्यांनी सर्व चर्चांचा समाचार घेतला.

‘मी लेचापेचा माणूस नाही. गेले 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत असतो’, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. या दरम्यान अमित शाहांना आपण तक्रार करण्यासाठी भेटलो नसल्याचं स्पष्टीकरणीही अजित पवारांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे दौऱ्यावर असून शासकीय कार्यालयातील कामकाजाची पाहणी ते करणार आहेत.
मराठा समाजाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा आणि मराठा समाजातील तरुणांना प्रशिक्षण मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या कार्यालयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन संस्थेच्या आवारात सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

यावेळी अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. मराठा समाजाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा आणि मराठा समाजातील तरुणांना प्रशिक्षण मिळावे यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

सरकारी कार्यालये भाड्याच्या जागेत नको

भाड्याच्या जागेत शासकीय ऑफिस नको आहेत .राज्यात आता अनेक बदल झाले आहेत आणि अनके बदल होत आहेत. शासकीय इमारती चांगल्या असाव्यात त्या सरकारी जागेतच असाव्यात असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही

अजित पवार म्हणाले, माजी उपपंतप्रधान पहिले मुख्यमंत्री चव्हणांची आज पुण्यतिथी म्हणून त्यांना अभिवादन केलं. दिवाळीपूर्वी डेंग्यूच्या आजारामुळे 15 दिवस वाया गेलेत. त्यावर बरीच चर्चा झाली पण राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेली 32 वर्षे स्पष्टपणे मांडत आलो आहे. अमित शहांना भेटलो, कुणी म्हटलं तक्रार करण्यासाठी अमित शाहांना भेटलो पण ही माहिती खोटी आहे. तक्रार करणे हे माझ्या स्वभावात नाही.

हेही वाचा

Nashik News : पोलीस पाटील, कोतवाल भरतीची दहा डिसेंबरला परीक्षा

Pune News : बेशिस्त चालकांना आता 1 हजारापेक्षा अधिक दंड

दाजीपूर अभयारण्यातील पर्यटन हंगाम बहरला!

Back to top button