Pune News : बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

Pune News : बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

पुणे/पिंपरी : आयकर विभागाने पुणे तसेच पिंपरीतील चार बांधकाम व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयांवर गुरुवारी (दि.23) छापेमारी केली. सकाळी 8 पासून ही छापेमारी सुरू करण्यात आली होती. शिवाजीनगर भागातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकारी सकाळीच येऊन धडकले.

हे व्यावसायिक पुण्यासह बंगळुरू येथे रिअल इस्टेटमध्ये तसेच इंडस्ट्रीयल आणि इन्फ्रास्टकचरच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अधिकार्‍यांनी दिवसभर कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे छापे नेमके कशासाठी घालण्यात आले, याबाबत आयकर विभागाकडून काहीही माहिती देण्यात आली नाही पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी येथे राहणार्‍या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर गुरुवारी सकाळी आयकर विभागाची वाहने दाखल झाली. वाकड आणि किवळे येथील बांधकाम व्यावसायिकांवरदेखील आयकर विभागाने छापेमारी केल्याचे समोर आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news