मात्र, अत्यावश्यक बाब असलेल्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे बरेचदा दुर्लक्ष होते. मुला-मुलींच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी आजकाल पालक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापूर्वी स्वच्छतागृहांबाबत प्राधान्याने विचारणा आणि पाहणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवाणू, ई कोलाई मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि तेव्हा मूत्रपिंड, मूत्राशय किंवा मूत्रवाहिनीचा दाह उदभवतो. त्यामुळे मुलांमध्ये संसर्गाचा धोका निर्माण होतो. अस्वस्छ स्वच्छतागृहांमुळे मुलींमध्ये मूत्र रोखून धरण्याचे प्रमाणही जास्त आहे.