लग्नकार्याची लगबग, पुण्यातले ‘गुरुजी ऑन डिमांड’!

लग्नकार्याची लगबग, पुण्यातले ‘गुरुजी ऑन डिमांड’!

पुणे : लग्नसराई सुरू झाली अन् मुहूर्त गाठायला गुरुजी म्हणजेच पुरोहितांकडे रांगाच रांगा लागल्या आहेत. पुण्यातल्या गुरुजींना फक्त पुण्यातूनच नव्हे, तर सातारा, सांगली, कोल्हापूरबरोबरच 700 किलोमीटवर असलेल्या नागपूरकडूनही लग्नकार्यांसाठी मागणी येऊ लागली आहे. एकंदरीत 'स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं…' या खड्या आवाजातल्या पुण्यातल्या गुरुजींच्या मंगलाष्टकांना महाराष्ट्राच्या अनेक भागांतील वर्‍हाडी शुभमंगल सावधानचा प्रतिसाद देत आहेत.

सध्याच्या लग्नसराईच्या धूमधडाक्यात पुण्यातील गुरुजींकडे (पुरोहित) लग्नकार्यांसाठी मागणी वाढली आहे. लग्नकार्यांसाठी पुणे जिल्ह्याबाहेर म्हणजे अगदी नागपूरपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. विविध जिल्ह्यांमध्ये लग्नकार्ये पार पाडण्यासाठी पुण्यातील गुरुजी ऑन डिमांड आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत गुरुजीही (पुरोहित) लग्नकार्यांच्या कामात व्यग्र आहेत. गुरुजींना मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली, नागपूर आदी जिल्ह्यांमध्ये लग्नकार्यांसाठी जावे लागत आहे. साखरपुडा, लग्न, श्रीसत्यनारायण पूजा असे तीन दिवसांचे कार्य ते पार पाडत आहेत. लग्नकार्यासाठी गुरुजींना 3 ते 8 हजार रुपयांपर्यंतचे मानधन मिळत आहे.

गुरुजी ऑन डिमांड संस्थेचे अजित चावरे म्हणाले, लग्नकार्ये सुरू झाली आहेत, त्यामुळे लग्नकार्ये पार पाडण्यात गुरुजी (पुरोहित) व्यग्र आहेत. आमच्या संस्थेशी जवळपास 600 ते 650 गुरुजी (पुरोहित) जोडलेले असून, या गुरुजींना संस्थेच्या माध्यमातून लग्नकार्यासाठीची कामे दिली जात आहेत. पुण्यातील गुरुजी लग्नकार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये जात आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लग्नसराईच्या सीझनमध्ये ठिकठिकाणी लग्नकार्यांसाठीची कामे मिळाली आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंतचे लग्नकार्यांसाठीचे बुकिंग झाले आहे. साखरपुडा, लग्न, श्रीसत्यनारायण पूजा असे तीन दिवसांचे कार्य ते पार पाडत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यातील लग्नकार्यांसाठीही विचारणा होत आहे.

– महेश शेवतीकर, गुरुजी (पुरोहित)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news