Pune News : लोकशाहीच्या संरक्षणासाठी जाहीरनामा विषयावर होणार चर्चा

Pune News : लोकशाहीच्या संरक्षणासाठी जाहीरनामा विषयावर होणार चर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आहे, अशी माहिती संयोजन समितीचे आनंद करंदीकर, सरिता आवाड, राजाभाऊ गायकवाड यांनी दिली.
हे संमेलन शनिवार (दि. 6) आणि रविवारी (दि.7 जानेवारी) गांधी भवन, कोथरूडमध्ये होणार आहे. योगेंद्र यादव, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. कुमार सप्तर्षी, निरंजन टकले, हरिश सदानी, सुनीती सु.र ., अजित रानडे, संदीप बर्वे आणि अन्य मान्यवर दोन दिवस विविध सत्रांत मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता योगेंद्र यादव यांच्या 'लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया' भाषणाने संमेलनाचा प्रारंभ होईल.

'लोकशाही खच्चीकरणाचे जागतिक प्रयत्न' या विषयावर अरविंद वैद्य यांचे, सुनीती सु. र. यांचे 'लोकशाही रक्षणासाठी लोकांचे धडे' या विषयावर, 'माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही' विषयावर अलका धुपकर, 'मुस्लिम मागासवर्गीय आणि लोकशाही रक्षण' या विषयावर तमन्ना इनामदार, प्रियदर्शी तेलंग हे 'लोकशाहीसाठी दलित संघटन' विषयावर व्याख्यान, वसुधा सरदार या 'दारूममुक्तीसाठी चळवळ उभारणी' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

रविवारी (दि.7 जानेवारी) समूहगीतांनी प्रारंभ होईल. 'सद्भावना मिशन' या विषयावर डॉ. राम पुनियानी, 'लोकशाही रक्षण' या विषयावर निरंजन टकले यांचे, 'स्त्रीवादासंदर्भात लैंगिक हक्क संरक्षण' या विषयावर हरिश सदानी, 'संविधान प्रचार चळवळीचा अनुभव' विषयाची माहिती संदीप बर्वे, 'स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला प्रतिनिधींचे सक्षमीकरण' या विषयावर भीम रासकर, 'लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा' या विषयावर अजित रानडे यांचे व्याख्यान होईल. 'लोकशाही रक्षणाच्या लढ्याची दिशा' विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी मार्गदर्शन करतील.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news