पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ऊसगाळप ‘खासगीं’कडून | पुढारी

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ऊसगाळप ‘खासगीं’कडून

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात 14 साखर कारखान्यांनी मिळून 29 डिसेंबरअखेर 50 लाख 57 हजार 853 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, तर सरासरी 9.1 टक्के उतार्‍यानुसार साखरेचे 46 लाख क्विंटलइतके उत्पादन तयार केले आहे. सर्वाधिक ऊसगाळप करण्यात खासगी साखर कारखान्यांचा डंका कायम आहे. कारण या कारखान्यांची दैनिक ऊसगाळप क्षमता अधिक आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने तुलनेने पिछाडीवर पडल्याचे दिसून येत आहे. बारामती अ‍ॅग्रो या खासगी साखर कारखान्याने 8 लाख 59 हजार टनाइतके सर्वाधिक ऊसगाळप पूर्ण केले आहे. तर आठ टक्के सरासरी उतार्‍यानुसार 6 लाख 40 हजार 660 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. त्या खालोखाल दौंड शुगरकडून 5 लाख 23 हजार 600 टन, पराग अ‍ॅग्रो फूड्स 5 लाख 11 हजार 26 टन आणि सोमेश्वर सहकारीकडून 5 लाख 8 हजार 900 टन ऊसगाळप पूर्ण केले आहे.

जिल्ह्यातील ऊसगाळप (टन)
कारखाना ः ऊसगाळप ः साखर उत्पादन ः उतारा
सोमेश्वर सहकारी ः 5,08,900 ः 5,50,700 ः 11.00
दि माळेगाव सह. ः 4,78,900 ः 4,71,600 ः 10.00
श्रीछत्रपती सह. ः 2,37,293 ः 2,30,000 ः 9.00
भीमा सहकारी ः 1,47,699 ः 1,41,075 ः 8.00
विघ्नहर सह. ः 3,33,170 ः 3,29,300 ः 11.00
कर्मयोगी सह. ः 1,86,425 ः 1,51,550 ः 9.00
श्रीसंत तुकाराम सह. ः 1,92,900 ः 2,06,700 ः 11.00
भीमाशंकर सहकारी सह. ः 3,94,030 ः 4,07,100 ः 10.00
निरा-भीमा सह. ः 1,52,800 ः 92,690 ः 7.00
श्रीनाथ म्हस्कोबा-खासगी ः 2,59,565 ः 2,20,100 ः 8.00
दौंड शुगर ः 5,23,600 ः 3,90,500 ः 8.00
व्यंकटेशकृपा शुगर-खासगी ः 2,72,055 ः 2,67,820 ः 10.00
पराग अ‍ॅग्रो फुड्स-खासगी ः 5,11,026 ः 5,00,865 ः 10.00

एक कोटी टन गाळप बाकी
जिल्ह्यात चालू वर्षी 2023-24 मध्ये 1 कोटी 51 लाख टनाइतके ऊसगाळप अपेक्षित आहे. त्यामुळे झालेले ऊसगाळप पाहता, अद्याप एक कोटी टन उसाचे गाळप पूर्ण होणे बाकी आहे. त्यामध्ये दुष्काळी स्थितीमुळे प्रत्यक्षात ऊसगाळप कमी होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील 9 सहकारी आणि 5 खासगी मिळून 14 कारखान्यांकडून दैनिक 1 लाख 23 हजार 250 टनाइतके रोजचे ऊसगाळप सुरू आहे. त्यामुळे किमान दोन महिने जिल्ह्यातील ऊसगाळप हंगाम चालण्याचा अंदाजही अधिकार्‍यांनी वर्तविला.

Back to top button