Pune Neuroharmony Conference: पुण्यात ‘न्यूरोहार्मनी २.०’ राष्ट्रीय परिषद; मेंदू आरोग्य आणि न्यूरो पुनर्वसनावर देशभरातील तज्ज्ञांची चर्चा

२३ ते २६ जुलैदरम्यान आयोजन; न्यूरोलॉजिकल आजारांवरील उपचार, मानसिक आरोग्य व सहाय्यक तंत्रज्ञानावर भर
Brain
BrainPudhari
Published on
Updated on

पुणे: डीईएस ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि निश ॲडवोकेसी फाउंडेशन यांच्या वतीने २३ ते २६ जुलै या कालावधीत 'न्यूरोहार्मनी २.०' या राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचे आयोजन केले आहे. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगारखेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Brain
Pune Mutual Divorce Case: मुलीच्या भवितव्यास प्राधान्य देत २३ दिवसांत घटस्फोट मंजूर; वडिलांकडे राहणार कायमस्वरूपी ताबा

प्राचार्या डॉ. स्नेहल जोशी आणि निश संस्थेच्या डॉ. पौर्णिमा गौरी यावेळी उपस्थित होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन इंडियन फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलेशनचे संस्थापक डॉ. निर्मल सूर्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Brain
Pune Prostitution Racket: नवले ब्रिज परिसरातील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत

मेंदूचे आरोग्य, न्यूरो-पुनर्वसन, न्यूरो-पॅलिएटिव्ह केअर आणि सर्वसमावेशक उपचारपद्धती यावरील देशभरातील तज्ज्ञ, संशोधक या परिषदेत सहभागी होणार आहेत.न्यूरोलॉजिकल आजारांवरील उपचार केवळ औषधोपचारांपुरते मर्यादित न राहता लवकर निदान, बहुविद्याशाखीय पुनर्वसन, मानसिक आरोग्य, केअरगिव्हर्सचे सक्षमीकरण, सहाय्यक तंत्रज्ञान आणि समाजाचा सहभाग या सर्व बाबींचा समन्वय साधण्यावर परिषदेत भर दिला जाईल.

Brain
Balgandharva Tanpura: बालगंधर्वांचा ऐतिहासिक तानपुरा आता गोपाळ गायन समाजाच्या संग्रहात; शंभर वर्षांचा संगीत वारसा जपला जाणार

...हे आहेत महत्त्वाचे कार्यक्रम

२४ जुलै - सायं. ६ ते ८ रिश्तों का मांजा : संगीत, मेंदू आणि मनःस्वास्थ्याचा संगम. २४ ते २६ जुलै - सकाळ ११ ते सायं. ६ - ब्रेन अँड माइंड प्रदर्शन - मेंदू व मनःस्वास्थ्याशी संबंधित सेवा, संस्था उपक्रमांचे प्रदर्शन २६ जुलै - सकाळी ९ ते दुपारी २ - सेवाशुश्रूषा अभियान,रुग्णांच्या अनुभवकथा, बोलावा विठ्ठल- संगीत, ज्ञानावर आधारित कार्यक्रम, मृत्युंजय - मुक्त संवाद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news