Pune Municipal Theatre Income: महापालिकेच्या नाट्यगृहांची कमाई 3.09 कोटींवर; उपनगरांतील नाट्यगृहे मागे

बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव तुपे नाट्यगृहांची दमदार कमाई; काही उपनगरांतील केंद्रांना अल्प प्रतिसाद
Theatre
TheatrePudhari
Published on
Updated on

पुणे: बालगंधर्व रंगमंदिर, श्री गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट), यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) अन्‌‍ नव्याने बांधण्यात आलेले विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर) ही नाट्यगृहे चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करणारी नाट्यगृहे ठरली आहेत. मात्र, दुसरीकडे उपनगरांतील नाट्यगृहांना गेल्या अकरा महिन्यांत अपेक्षित उत्पन्नही गाठता आलेले नाही. त्यामुळे उपनगरांतील नाट्यगृहांची कमाईची स्थिती ‌‘जैसे थे‌’च असून, सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विजय तेंडुलकर नाट्यगृहाने तर फक्त 1 लाख 34 हजार 280 रुपयांची कमाई केली आहे.

Theatre
Pune Illegal Hookah Parlour Raid: धनकवडीत अवैध हुक्का पार्लरवर छापा; पाच जण ताब्यात

शहर आणि उपनगरांत महापालिकेची 15 नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रे आहेत. गेल्या अकरा महिन्यांत महापालिकेच्या नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रांकडून अंदाजपत्रकानुसार 4 कोटी 43 लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना आत्तापर्यंत फक्त 3 कोटी 9 लाख 94 हजार 068 रुपयांचे उत्पन्नच सांस्कृतिक विभागाला मिळाले आहे. 1 मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026 या काळात बालगंधर्व रंगमंदिराने 66 लाख 42 हजार 519, यशवंराव चव्हाण नाट्यगृहाने 56 लाख 43 हजार 551, श्री गणेश कला क्रीडा रंगमंच नाट्यगृहाने 44 लाख 40 हजार 219 आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाने 40 लाख 60 हजार 677 रुपयांची कमाई करून पसंती मिळवली आहे. पण, त्यातुलनेत उपनगरातील नाट्यगृहांच्या कमाईचा आकडा खूप कमी आहे. काही नाट्यगृहांनी तर फक्त 1 ते 3 लाख रुपयांची कमाई केली आहे.

Theatre
Pune Triple Seat Traffic Action: पुण्यात ट्रिपलसीट दुचाकीचालकांवर पोलिसांची धडक कारवाई

कमी कमाई करणारी नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रे

  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर (येरवडा): 10 लाख 63 हजार 975

  • पंडित भीमसेन जोशी कलामंदिर (औंध): 10 लाख 45 हजार 872

  • शिवसेनाप्रमुख व्यंग्यचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालन: 9 लाख 28 हजार 157

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक): 4 लाख 99 हजार 295

  • सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन (भवानी पेठ): 3 लाख 38 हजार 665

  • मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क): 1 लाख 63 हजार 245

  • विजय तेंडुलकर नाट्यगृह (सहकारनगर): 1 लाख 34 हजार 280

  • पंडित भीमसेन जोशी कलादालन (सहकारनगर): 62 हजार 688

Theatre
Sudarshan Chemical Global Capability Center: पुण्यात सुदर्शन केमिकल-जेनपॅक्टचे ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर सुरू

कमाई करणारी नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रे

  • (1 मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026)

  • बालगंधर्व रंगमंदिर: 66 लाख 42 हजार 519

  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड): 56 लाख 43 हजार 551

  • श्री गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट): 44 लाख 40 हजार 218

  • विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर): 40 लाख 60 हजार 677

  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (बिबवेवाडी): 27 लाख 54 हजार 704

  • महात्मा फुले सांस्कृतिक भवन (वानवडी): 16 लाख 45 हजार 848

  • पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी (घोले रस्ता): 15 लाख 70 हजार 374

Theatre
Kasewadi Dies Plot Ward Development: काशेवाडी डायस प्लॉट प्रभागात बदल घडवणार; नगरसेविका मृणाल कांबळेंचा विकासाचा संकल्प

उपनगरांतील नाट्यगृहांमध्ये कार्यक्रमांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या नाट्यगृहांबाबत आयोजकांना माहिती देण्यासह त्यांना नाट्यगृहात कार्यक्रम करण्याविषयी प्रोत्साहितही करीत आहोत. आता काही नाट्यगृहांना प्रतिसाद मिळू लागला आहे. नाट्यगृहांच्या उत्पन्नवाढीसाठीही आम्ही विविध योजना राबवीत आहोत. नाट्यगृहांमधील वाहनतळ आणि कॅन्टीनबाबतची निविदा काढून ते भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे आणि त्यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत.

राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, महापालिका नाट्यगृह विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news