Sudarshan Chemical Global Capability Center: पुण्यात सुदर्शन केमिकल-जेनपॅक्टचे ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर सुरू

बाणेर येथील मुख्यालयात जागतिक कार्यपद्धती अधिक सक्षम; ऑटोमेशन व डिजिटल क्षमतांना चालना
Technology
TechnologyPudhari
Published on
Updated on

पुणे: जागतिक स्तरावर पिगमेंट व रंगद्रव्ये उत्पादनातील अग््रागण्य असलेल्या सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील जेनपॅक्ट या संस्थांच्या वतीने पुण्यात ग्लोबल कपॅबिलिटी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. सुदर्शन केमिकलचा जागतिक कार्यपद्धतीला अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Technology
Kasewadi Dies Plot Ward Development: काशेवाडी डायस प्लॉट प्रभागात बदल घडवणार; नगरसेविका मृणाल कांबळेंचा विकासाचा संकल्प

पुण्यातील बाणेर येथील सुदर्शन केमिकलच्या जागतिक मुख्यालयात स्थापन केलेल्या या केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. या केंद्रात यापूर्वी विविध देशांत विभागून कार्यरत असलेली महत्त्वाची एंटरप्राइज कार्ये एकत्रित करण्यात आली आहेत. यामुळे विविध भौगोलिक क्षेत्रांतील समन्वय अधिक सुलभ होण्यासह प्रशासन, निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार आहे.

Technology
Pune Municipal Election Analysis: रामटेकडी–माळवाडी प्रभागात भाजपचा विजय; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सुदर्शन केमिकलचे जागतिक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांनी सांगितले, जागतिक स्तरावर विस्तार करीत असताना कार्यक्षमतेतील सातत्य आणि उत्कृष्ट अंमलबजावणी हे स्पर्धात्मक लाभ ठरतात. पुण्यातील हे ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर प्रक्रियांची कार्यक्षमता वाढवेल, ग््रााहकांना जलद व दर्जेदार सेवा देण्यास मदत करेल आणि संस्थेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा व ग््रााहककेंद्रित संस्कृती अधिक मजबूत करेल.

Technology
Pune Municipal GST Grant Pending: जीएसटी व मुद्रांक शुल्क अधिभार अनुदान थकीत; पुणे महापालिकेवर 3045 कोटींचा आर्थिक ताण

2025 मध्ये जर्मनीतील ह्युबॅक ग््रुापच्या अधिग््राहणानंतर सुदर्शन केमिकलचा जागतिक विस्तार लक्षणीयरीत्या वाढला आहे. नव्याने स्थापन केलेले हे जीसीसी सेंटर कंपनीच्या ‌‘खऱ्या अर्थाने जागतिक पिगमेंट कंपनी‌’ बनण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हे केंद्र भारताबाहेरील सुदर्शन केमिकलच्या जागतिक कार्यपद्धतींना पाठबळ देणार असून, भविष्यातील ऑटोमेशन, प्रमाणित प्रक्रिया तसेच डिजिटल क्षमतांचा विस्तार करण्यासाठी भक्कम पाया निर्माण करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Technology
Maharashtra Kesari Kusti 2026: महाराष्ट्र केसरी कुस्ती 2026 पुण्यात; वाघोलीच्या मातीत शड्डूचा गजर

जेनपॅक्टचे उत्पादन क्षेत्रासाठीचे जागतिक व्यवसायप्रमुख दिवाकर सिंगल म्हणाले, सुदर्शन केमिकलच्या ग्लोबल कपॅबिलिटी सेंटरमुळे आमच्यातील दीर्घकालीन भागीदारीला नवी दिशा मिळाली आहे. केमिकल उत्पादनातील आमचा अनुभव, प्रक्रिया बुद्धिमत्ता आणि एआयआधारित क्षमतांच्या माध्यमातून सुदर्शनची प्रशासनिक क्षमता व जागतिक अंमलबजावणी अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news