Maharashtra Electric Buses: महाराष्ट्रात ५० हजार ई-बस धावणार; २०३० पर्यंत ५२ टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट!

सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य; ईव्ही चार्जिंग स्टेशन्ससाठी सरकार उभारणार स्वतंत्र परिसंस्था, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कोणत्याही शहरामध्ये सर्वाधिक प्रदूषण हे वाहनांमुळे होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर केला जाणार असून, त्यांना लागणारी वीज देखील हरित स्रोतातून दिली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एका मोबिलिटीच्या सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्‍घाटन मुख्यमंत्री फडणीवस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते.

Devendra Fadanvis
Sugar Price Hike: दिवाळीत साखरेचा गोडवा महागणार? घाऊक दरांत क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ; ५५०० रुपयांवर स्थिरावले भाव!

फडणवीस म्हणाले की, वाढत्या प्रदूषणामुळे स्वच्छ आणि हरीत वाहतूक ही आपली प्राथमिकता झाली आहे. केंद्र सरकार ई-वाहनांना प्राथमिकता देत असून, महाराष्ट्र ईव्हीचे हब बनले आहे. पुण्याबरोबरच छत्रपती संभाजीननगर नागपूरमध्ये ईव्हीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

Devendra Fadanvis
Unaided to Aided Teacher Transfer: विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानितवर बदलीचे प्रस्ताव तातडीने सादर करा; शिक्षण आयुक्तांचे आदेश!

महाराष्ट्र सरकार देखील तीन वर्षांत ५० हजार बस ई-बस घेणार आहे. वाढत्या इलेक्ट्रिक बसला लागणारी ऊर्जा हरित असेल, याची काळजी घेतली जाईल. २०३० पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण विद्युत निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचा वाटा ५२ टक्के टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. अगदी डेटा सेंटर्सला देखील ५० टक्के ऊर्जा हरित स्रोतांद्वारे दिली जाईल.

Devendra Fadanvis
Ambegaon Potato Price: आंबेगावच्या बटाट्याला प्रतिक्विंटल ३ हजारांचा भाव; परराज्यांतील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर!

‘चार्जिंग परिसंस्था उभारणार’

वाढत्या ईव्हीसाठी चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासेल. ईव्ही उत्पादकांना सोबत घेऊन चार्जिंग परिसंस्था सरकार उभारेल. कंपन्यांना चार्जिंग स्टेशन्ससाठी आवश्यक असेली जमीन आणि इतर परवानग्या आम्ही देऊ. या चार्जिंग स्टेशनसाठी सोलर आवरमध्ये सौरऊर्जा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.