Pune municipal schools CCTV: महापालिकेच्या 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणार

चार कोटींच्या पूर्वगणक पत्राला मान्यता; 91 शाळांमध्ये बसवले 852 सीसीटीव्ही
Pune municipal schools CCTV
महापालिकेच्या 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणारpudhari
Published on
Updated on

पुणे : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात सुमारे 91 शाळांमध्ये 862 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी चार कोटी रुपयांच्या पूर्वगणक पत्रकाला मान्यता देण्यात आली आहे.(Latest Pune News)

Pune municipal schools CCTV
Pune Wada redevelopment: आठ वर्षांत एकही प्रस्ताव नाही! पुण्यातील वाड्यांच्या क्लस्टर पुनर्विकास योजनेला ब्रेक

बदलापूरमध्ये शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचा आदेश दिला होता. पुणे महापालिकेच्या शहराच्या जुन्या हद्दीसह समाविष्ट 32 गावांत मिळून सुमारे 300 शाळा आहेत.

Pune municipal schools CCTV
Electricity Employees Strike Suspended | महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीचा संप स्थगित

विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाने एकत्रितपणे सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. शाळेच्या इमारतीमध्ये किती खोल्या आहेत, किती मजले आहेत, मोकळी जागा, प्रवेशद्वार किती आहेत याची पाहणी केली. त्यानुसार या सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच्या पहिल्या टप्प्यात 91 शाळांमध्ये 862 सीसीटीव्ही बसवण्यात आले असून आता आणखी 90 शाळांमध्ये 4 कोटी रुपये खर्च करून नव्याने सीसीटीव्ही बसवले जाणार आहे. यानंतर देखली 150 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम बाकी राहणार असून तेथे देखील टप्प्या-टप्प्याने सीसीटीव्ही बसविले जाणार असल्याची माहिती, विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.

Pune municipal schools CCTV
Lieutenant After Ten Attempts: दहावेळा अपयश, आता थेट लेफ्टनंट

मुलींच्या शाळांना प्राधान्य

खासगी तसेच शासकीय शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये तेथे काम करणारे कर्मचारी, शिक्षक, बसचालक यासह अन्य लोकांकडून मुलींना लक्ष्य केले जाते. त्यामुळे महापालिकेने पहिल्या टप्प्यात प्राधान्याने सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुलींच्या शाळांची निवड केली आहे.

Pune municipal schools CCTV
Daund Municipal Election 2025: दौंडमध्ये आ. कुल-कटारिया यांचे काय ठरणार? नगराध्यक्षपदाच्या शर्यतीकडे लक्ष

गैरप्रकार रोखण्याचा प्रकार

शहरात महापालिकेच्या सुमारे 300हून अधिक शाळा आहेत. सुमारे दीडशे इमारतींमध्ये त्या भरतात. काही शाळांना मोठी मैदानेही आहेत. तेथे सुरक्षारक्षक नेमले असले तरी त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात कचरा टाकणे, शाळेतील साहित्य चोरणे, मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपी तसेच नशेखोरांचा वावर असणे, गुन्हेगारी कृत्य करणे अशा प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांचे नुकसान टाळणे, तसेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news