Pune Municipal Elections: महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! बहुप्रतीक्षित प्रारूप प्रभागरचना अखेर जाहीर

41 प्रभागांतून 165 नगरसेवक द्यावे लागणार निवडून; 4 सप्टेंबरपर्यंत नोंदविता येणार हरकती
Pune News
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! बहुप्रतीक्षित प्रारूप प्रभागरचना अखेर जाहीरPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणेकरांच्या राजकीय उत्सुकतेला पूर्णविराम देत पुणे महापालिका निवडणुकीसाठीची प्रस्तावित प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (दि. 22) अखेर जाहीर करण्यात आली. या प्रभागरचनेनुसार महापालिकेत एकूण 41 प्रभाग असणार असून, 165 नगरसेवक निवडून येणार आहेत.

त्यापैकी 40 प्रभागांतून प्रत्येकी चार नगरसेवक, तर आंबेगाव-कात्रज या प्रभागांतून पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही प्रभागरचना जाहीर केली. याबाबत कुणाला शंका असल्यास 3 सप्टेंबरपर्यंत यावर हरकती नोंदविता येणार आहेत. (Latest Pune News)

Pune News
Dry fruits GST: सुकामेवा किलोमागे 21 ते 84 रुपयांनी होणार स्वस्त; ‘जीएसटी’मध्ये कपात केल्याचा परिणाम

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन, प्रशासकीय अधिकारी तसेच निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर, नगरविकास सचिव योगिता भोसले उपस्थित होते.

महापालिकेची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपली होती. यानंतर गेल्या 3 वर्षांपासून निवडणुका रखडल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत अधिसूचना काढून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने हालचालींना गती दिली.

राज्य शासनाने महापालिकेला प्रभागरचना प्रसिद्ध करण्यासाठी 22 ऑगस्टची अंतिम मुदत दिली होती. त्याअंतर्गत प्रारूप प्रभागरचना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. नगरविकास विभागाने प्रभागरचनेचे वेळापत्रक आधीच निश्चित केले होते. त्यानुसार प्रभागरचना तयार करून आयोगाकडे सादर करण्यात आली. या प्रभागरचनेला मान्यता मिळाल्यावर शुक्रवारी संध्याकाळी ती जाहीर करण्यात आली.

प्रभागरचनेची माहिती देताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, महापालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करताना 2011 ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार 41 प्रभाग असून, यातील 40 प्रभाग हे 4 सदस्यीय राहणार आहेत, तर एक प्रभाग हा 5 सदस्यांचा राहणार आहे. यातील 40 प्रभागांची मतदारसंख्या 84 हजारांपेक्षा जास्त तर 5 नगरसेवकांचा केवळ 1 प्रभाग असून, मतदारसंख्या 1 लाख 5 हजार आहे. प्रभाग क्रमांक 38 हा 5 सदस्यांचा करण्यात आला आहे.

Pune News
GST Slab Medicines: जीएसटी स्लॅब कमी, ग्राहकांना दिलासा; औषधे होणार स्वस्त

आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचना

प्रभागरचना करताना चारसदस्यीय 40 प्रभागांतील लोकसंख्या ही सरासरी 84 हजार 396 इतकी गृहीत धरली गेली, तर पाचसदस्यीय प्रभागातील लोकसंख्या ही कमीत कमी 94 हजार आणि जास्तीत जास्त 1 लाख 16 इतकी गृहीत धरण्याचे बंधन निवडणूक आयोगाने घातले होते. त्यानुसार ही प्रभागरचना केल्याचा दावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला.

हरकती-सूचना 4 सप्टेंबरपर्यंत नोंदविता येणार

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेबाबत नागरिकांना त्यांच्या हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. येत्या 3 सप्टेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहे. महापालिका मुख्य भवन, 15 क्षेत्रीय कार्यालये तसेच सावरकर भवन येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालय अशा तीन ठिकाणी या हरकती नोंदविता येणार आहेत. 4 सप्टेंबरनंतर महापालिकेकडे आलेल्या हरकतींची छानणी करून त्यावर सुनावणी घेतली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती

पुणे महानगरपालिकेचा प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभागरचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगररचनाकार, संगणकतज्ज्ञ आदींचा समावेश करण्यात आला होता.

या समितीने नदी, नाले, डोंगर ही सीमारेषा ठरवून प्रारूप आराखडा तयार करून तो नगरविकास मंत्रालयाकडे सादर केला होता. नगरविकास खात्याने याला मंजुरी देऊन तो निवडणूक आयोगाला सादर केला होता. यानंतर तो शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

पाचसदस्यीय आंबेगाव-कात्रज मतदारसंघ ठरला सर्वांत मोठा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, 2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची 34 लाख 81 हजार 359 लोकसंख्या गृहीत धरत ही प्रभागरचना करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4 लाख 68 आजार 633 इतकी आहे, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 40 हजार 687 एवढी आहे.

निवडून द्यायची सदस्यसंख्या 165 राहणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागरचनेनुसार आंबेगाव- कात्रज हा सर्वाधिक मोठा (1,14,970) आणि अप्पर-सुपर इंदिरानगर हा सर्वांत लहान (75,944 लोकसंख्या) प्रभाग ठरला आहे. जाहीर केलेल्या प्रभागरचनेनुसार कळस-धानोरी हा प्रभाग क्रमांक 1 ठरला असून, महंमदवाडी-उंड्री प्रभाग हा शेवटचा म्हणजेच 41 क्रमांकाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news