

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना प्रभाग क्रमांक ३६ मध्ये राजकीय वातावरणात कमालीचा तणाव आणि उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक फेरीगणिक बदलणाऱ्या आकड्यांमुळे विजयाचे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे झुकताना दिसत होते.
जागा 'अ' मध्ये विणा घोष आणि सुभाष जगताप यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. वीणा घोष यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी टिकवून ठेवली आणि एकूण २१,४३० मते मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.सुभाष जगताप यांनीही कडवी झुंज देत १८,१३४ मते मिळवली, मात्र त्यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. जागा क मध्ये नीलम गांधी यांनी तब्बल १८,५५६ मते घेत मोठी आघाडी घेतली, तर सई थोपटे यांनी २०,७९७ मते मिळवून या प्रभागात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.जागा ड च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे महेश वाबळे यांनी १८,१०४ मते मिळवून मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. सुशांत डमढेरे ११,२४४ मते मिळाली, त्यांनाही या भागात चांगली मते घेतली.
विशेष म्हणजे, या प्रभागात अनेक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता 'नोटा' चा पर्याय निवडल्याचे दिसून आले. विविध जागांसाठी सरासरी ५,१८८ मतदारांनी नोटाचा वापर केल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
विजयाचे अधिकृत आकडे जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. "हा विजय जनतेचा असून विकासाच्या कामाला दिलेली ही पोचपावती आहे, अशा भावना विजयी उमेदवारांनी यावेळी व्यक्त केल्या.
महत्त्वाची आकडेवारी (विजयी कल):-
विजयी उमेदवार - मिळालेली एकूण मते
1) सई प्रशांत थोपटे - २०,७९७
2) वीणा गणेश घोष -२१,४३०
3) नीलम गणेश गांधी - १८,५५६
4) महेश नानासाहेब वाबळे - १८,१०४