Pune Municipal E Learning Delay‌: ‘ई-लर्निंग‌’ सुरू होण्यास दिवाळीनंतरच मुहूर्त!

पालिकेचे विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित : इंटरनेट पुरविण्यासाठी होतोय उशीर
Pune Municipal E Learning Delay‌
‘ई-लर्निंग‌’ सुरू होण्यास दिवाळीनंतरच मुहूर्त!Pudhari
Published on
Updated on

पुणे : माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटीनगरी असलेल्या पुण्यातील महापालिकेच्या शाळांमधील ई-लर्निंग स्कूल प्रकल्प मागील तीन वर्षांपासून ठप्प झाला आहे. केवळ इंटरनेट नसल्याने ही यंत्रणा बंद पडली असून विद्यार्थी हायटेक शिक्षण घेण्यापासून वंचित आहेत. इंटरनेट सुविधा देण्यासाठीची फाइल ऑडिट विभागाकडे अडकून पडल्याने दिवाळी नंतरच ही यंत्रणा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.(Latest Pune News)

Pune Municipal E Learning Delay‌
Maharashtra Olympic Association Election: राज्य ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक रंगणार

पुणे महापालिकेने मागील सात ते आठ वर्षांपासून त्यांच्या शाळांमध्ये ई-लर्निंग उपक्रम सुरू केला. सुरुवातीला खासगी संस्थेच्या मदतीने काही शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आल. नंतर जवळपास सर्वच अर्थात 265शा ळांमध्ये ई-लर्निंगची व्यवस्था उभारण्यात आली. सर्व वर्ग खोल्यांमध्ये स्क्रीन बसविण्यात आला असून, शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयातून सॉफ्टवेअरद्वारे दृकश्राव्य स्वरूपात शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले. सन 2020 आणि 2021 मुळे कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने हा प्रकल्प बंद राहिला. दरम्यान या कालावधीतच इंटरनेट सेवा खंडीत झाली आणि तेंव्हापासूनच ई-लर्निंग बंद झाले आहे.

Pune Municipal E Learning Delay‌
Maharashtra Olympic Association Election: राज्य ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक रंगणार

सध्या प्रशासकराज सुरू आहे. असे असताना ई-लर्निंग सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून फारसे प्रयत्न झालेले नसल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने ‌‘ई-लर्निंग प्रकल्प‌’ जवळपास पूर्ण बंद पडला आहे. महापालिकेच्या 265 शाळांमध्ये गरीब कुटुंबातील जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंटरनेटच्या युगात आता ‌‘एआय‌’ तंत्रज्ञान आले आहे. मात्र महापालिकेचा ई लर्निंग प्रकल्प बंद झाल्याने पुढील काळात हे विद्यार्थी कसे तग धरू शकणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

Pune Municipal E Learning Delay‌
Maharashtra Olympic Association Election: राज्य ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक रंगणार

यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप चंद्रन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ई-लर्निंग शाळा प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. इंटरनेट सुविधा पुरविण्यासंदर्भात फाइल ऑडिट विभागाकडे प्रलंबित असून लवकरात लवकर त्यावर आवश्यक मंजुऱ्या घेऊन येत्या काही दिवसांत ज्या शाळांमध्ये ही यंत्रणा आहे आशा 148 शाळांमध्ये येत्या काही काळात हा प्रकल्प सुरू तातडीने सुरू केला जाईल.

Pune Municipal E Learning Delay‌
Pune Unauthorized Flex Crackdown: अनधिकृत फ्लेक्सबाजांवर कारवाई; मात्र नेत्यांना अभय!

शहरात सध्या सुरक्षिततेसाठी महाप्रीत सारख्या कंपन्यांना उघड्यावरून केबल टाकण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. या सोबतच पोलिसांच्या सिसिटीव्ही यंत्रणेसाठी देखील रस्ते खोदून केबल टाकल्या जात आहेत. मात्र, तीन वर्षांपासून ई लर्निंग सुविधेवर तब्बल 20 कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्चून देखील ही सुविधा अद्याप पालिकेला सुरू करता आलेली नाही.

Pune Municipal E Learning Delay‌
World Mental Health Day: आपत्ती काळात सुलभ व्हाव्यात मानसिक आरोग्यसेवा

ई-लर्निंग योजनेचा प्रवास

2017 - ई-लर्निंग प्रकल्पाचा प्रारंभ

ऑक्टोबर 2022 - ई-लर्निंग यंत्रणा ठप्प

265 शाळांमध्ये ही यंत्रणा होती कार्यान्वित

खर्च - 20 कोटी 99 लाख रुपये

प्रकल्पाचे लाभार्थी - एक लाख विद्यार्थी

इंटरनेट सुविधा देण्यास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news