

पुणे: महापालिकेला नुकतीच ईमेलद्वारे उडवून देण्याची धमकी मिळाल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिकेची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी मंत्रालयाच्या धर्तीवर कडक नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेत भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला निश्चित नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी स्वतंत्र व सर्वंकष नियमावली तयार करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले असून, पुढील दहा दिवसांत हा प्रस्ताव समितीसमोर सादर केला जाणार आहे. महापालिकेला नुकतीच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महापालिकेत भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला निश्चित नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी स्वतंत्र व सर्वंकष नियमावली तयार करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले असून, पुढील दहा दिवसांत हा प्रस्ताव समितीसमोर सादर केला जाणार आहे. महापालिकेला नुकतीच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बॉम्ब धमकीच्या घटनेनंतर महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. यात अनेक त्रुटी समोर आल्या. काही सुरक्षारक्षकांकडे वैध ओळखपत्रे नसल्याचे आढळून आले. काही जण केवळ दोरीला कार्डसदृश वस्तू लटकवून काम करत असल्याचे आढळले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे महापालिकेच्या विविध प्रवेशद्वारांवर सुरक्षा कठोर करण्यात आली आहे.
नागरिकांच्या बॅगा व सामानाची तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवण्याची आता व्यवस्था करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती कोणत्या कामासाठी आली आहे, कोणत्या विभागात जाणार आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटणार आहे, याची माहिती नोंदवूनच त्याला महापालिकेच्या आवारात आता प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी 'व्हिजिटर पास' देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय न करता सुरक्षिततेची खात्री देणे आवश्यक आहे. त्यामुळे आधुनिक सुरक्षा निकषांनुसार नियमावली तयार केली जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.
नव्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख नियम:
'बुके' (पुष्पगुच्छ) आणण्यावर बंदी:
व्हिजिटर कार्ड अनिवार्य
वेळेचे नियंत्रण: मंत्रालयाच्या धर्तीवर नागरिकांना विशिष्ट वेळेतच प्रवेश दिला जाईल, जेणेकरून विनाकारण होणारी गर्दी टळेल.
सायबर सिक्युरिटी मजबूत करणार : पालिकेचा डेटा हॅक होऊ नये म्हणून आधुनिक संगणकीय सुरक्षा प्रणाली कार्यान्वित केली जात आहे.
महापालिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे साहित्य आणि बॅग कडक तपासली जाईल.