Pune School DBT Scheme: महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना DBTद्वारे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी 47.65 कोटींची मदत

गणवेश, बूट, दप्तर, वह्या आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निधी थेट बँक खात्यात; खरेदीची शाळास्तरावर पडताळणी होणार
Municipal School DBT
Municipal School DBTPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट-मोजे, दप्तरे, वह्या, लेखन साहित्य, स्वेटर तसेच अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजनेअंतर्गत आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Municipal School DBT
Pune Monsoon Arrival 2026: पुण्यात मान्सूनला आणखी प्रतीक्षा; १८ जूनच्या सुमारास पावसाची शक्यता

मात्र, केवळ निधी वितरित करून प्रशासन थांबणार नसून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आवश्यक शालेय साहित्याची खरेदी केली की नाही, याची पडताळणी करण्यासाठी शाळास्तरावर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी शुक्रवारी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांना आवश्यक गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी १५ जूनपर्यंत साहित्य खरेदी पूर्ण होण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही भिमाले यांनी स्पष्ट केले.

Municipal School DBT
Pune Market Jaggery Arrivals: एफडीए कारवाईचा गूळ बाजाराला फटका; पुण्यात गुळाची आवक ७५ टक्क्यांनी घटली

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करता यावे यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेअंतर्गत ४७ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीचा हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

Municipal School DBT
Pune HSRP Number Plate Deadline: पुण्यात HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत ३० जून २०२६; न बसवल्यास दंड व सेवा बंद

शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेचा शिक्षण विभाग दरवर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना राबवत आहे. याअंतर्गत मंजूर निधी विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. तसेच वसतिगृह किंवा सामाजिक संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आवश्यक कागदपत्रांअभावी बँक खाते उघडता न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबंधित संस्था अथवा वसतिगृहाच्या खात्यावर निधी जमा करण्याची तरतूद केली आहे.

Municipal School DBT
Maharashtra Milk Adulteration Action: दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा कडक इशारा; भेसळखोरांना कठोर कारवाईचा इशारा

स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने निधी वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या योजनेमुळे साहित्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून, विद्यार्थी आणि पालकांना गरजेनुसार साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news