Pune Monsoon Arrival 2026: पुण्यात मान्सूनला आणखी प्रतीक्षा; १८ जूनच्या सुमारास पावसाची शक्यता

उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची गती मंदावली; पुणेकरांना अजून पाच ते सहा दिवस पावसाची वाट पाहावी लागणार
Pune Rain Update
Pune Rain UpdatePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात मान्सून येण्यास अजून पाच ते सहा दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून सोलापूर ते बारामतीजवळ अडखळला आहे. परिणामी शहरात १८ जूनच्या सुमारास मान्सून सरी येतील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

Pune Rain Update
Pune Market Jaggery Arrivals: एफडीए कारवाईचा गूळ बाजाराला फटका; पुण्यात गुळाची आवक ७५ टक्क्यांनी घटली

शहरात दररोज ढग दाटून येतात. शुक्रवारी सकाळी गार वारे सुटल्याने पाऊस येईल असा अंदाज होता. मात्र, दिवसभर उकाडाच जाणवला. याबाबत हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की, मागच्या वर्षी पुण्यात २६ मे रोजीच मान्सून आला. परंतु उत्तरेतून आलेल्या कोरड्या वाऱ्यांनी तो दहा ते बारा दिवस महाराष्ट्रातच खोळंबला होता. तशीच स्थिती यंदा झाली आहे. अजून पाच ते सहा दिवस मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे नाहीत.

Pune Rain Update
Pune HSRP Number Plate Deadline: पुण्यात HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत ३० जून २०२६; न बसवल्यास दंड व सेवा बंद

पुण्यातील मान्सूचे आगमन ( १० वर्षे)

  • २०१७: १३ जून

  • २०१८: १० जून

  • २०१९: २६जून (सर्वात उशिरा )

  • २०२०: ११ जून

Pune Rain Update
Maharashtra Milk Adulteration Action: दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा कडक इशारा; भेसळखोरांना कठोर कारवाईचा इशारा
  • २०२१: १० जून

  • २०२२: २३ जून

  • २०२३: ११ जून

  • २०२४: ११ जून

  • २०२५: २६ मे (सर्वात लवकर)

Pune Rain Update
Pune Tree Cutting: बाणेरमध्ये धक्कादायक वृक्षतोड; अभिनव कला महाविद्यालयात मोठी कत्तल उघड

नेमके काय झाले आहे?

आयएमडी, पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांच्या मते उत्तर भारतातील कोरड्या वाऱ्यांनी राज्यातील मान्सून खोळंबला आहे. अजून पाच ते सहा दिवस तो सक्रिय होण्याची शक्यता नाही. हा अल निनोचा प्रभाव नसून तो उत्तरेतील कोरड्या वाऱ्यामुळे दरवर्षी अडकतोच. तशीच स्थिती यंदा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news