

पुणे: पुणे महापालिकेच्या 16 सदस्यीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार सुहास टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज एक मिनीट उशिरा दाखल झाल्याचे कारण देत निवडणूक अधिकारी तथा एसआरए आयुक्त सतीशकुमार खडके यांनी टिंगरे यांचा अर्ज अवैध ठरविल्याने भिमाले यांची निवड बिनविरोध झाली.
गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या 12 सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भाजपने आठ महिला सदस्यांना आणि चार नगरसेवकांना संधी देत महिलांना अधिक प्रतिनिधित्व दिले. एकूण 16 सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे 12 सदस्य, राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट)चे तीन सदस्य आणि काँग््रेासचा एक सदस्य आहे. स्थायी समितीत भाजपचे 12 सदस्य असल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक केवळ औपचारिक ठरणार, अशीच चर्चा होती. भाजपने भिमाले यांना उमेदवारी दिली होती, तर तीन सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून सुहास टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
निवडणूक प्रक्रियेसाठी एसआरए आयुक्त सतीशकुमार खडके यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीला सुरुवात होताच टिंगरे यांनी नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला; मात्र, तो नियोजित वेळेपेक्षा एक मिनीट उशिरा दाखल झाल्याचे नमूद करत खडके यांनी टिंगरे यांचा अर्ज अवैध ठरविला. यावर राष्ट्रवादी काँग््रेासच्या माजी महापौर वैशाली बनकर, माजी महापौर तथा काँग््रेासचे नगरसेवक प्रशांत जगताप हे टिंगरे अर्ज दाखल करण्यापूर्वीच नगरसचिव कार्यालयात उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा अर्ज ग््रााह्य धरण्यात यावा, अशी मागणी केली. तरीही निवडणूक अधिकाऱ्यांनी आपली भूमिका कायम ठेवत टिंगरे यांचा अर्ज अवैध असल्याचे जाहीर केले आणि श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड घोषित केली. भिमाले यांच्या निवडीचे महापौर मंजूषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच स्थायी समिती सदस्यांनी अभिनंदन केले.
भिमाले यांच्यावर मोठी जबाबदारी
स्थायी समिती ही महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाची समिती मानली जाते. महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर, खर्चाच्या मंजुरीवर आणि विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार या समितीकडे असतात. त्यामुळे अध्यक्षपदाला विशेष महत्त्व आहे. आगामी अर्थसंकल्प, प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
अमोल बालवडकर गैरहजर
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग््रेासचे सदस्य अमोल बालवडकर अनुपस्थित होते.
विरोधकांचा निवडणुका लढवण्याचा अधिकार तरी अबाधित ठेवा: जगताप
स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग््रेासने देखील अर्ज दाखल केला होता. सुहास टिंगरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, 11 ते 1 या कालावधी पेक्षा दोन मिनिटे उशिरा अर्ज केल्याने टिंगरे यांचा अर्ज निवडणूक प्रक्रियेसाठी एसआरए आयुक्त सतीशकुमार खडके यांनी अवैध ठरवला. राष्ट्रवादी काँग््रेासच्या माजी महापौर वैशाली बनकर तसेच माजी महापौर तथा काँग््रेासचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी टिंगरे हे अर्ज दाखल करण्यापूर्वीच नगरसचिव कार्यालयात उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा अर्ज ग््रााह्य धरण्यात यावा, अशी मागणी केली. यावर सभागृह नेते गणेश बिडकर व भाजपचे स्थायी समितीचे सदस्य विशाल धनवडे यांनी नियमाप्रामाणे निवडणूक सुरू ठेवावी, अशी मागणी करत निवडणूक प्रक्रिया योग्य असल्याची सांगितले. यावर कॉंग््रेासचे स्थायी समितीचे सदस्य प्रशांत जगताप यांनी विरोधकांचा निवडणूक लढण्याचा अधिकार तरी अबाधित ठेवा, असा टोला लगावत टिंगरे हे नगरसचिव यांच्या कार्यालयात वेळेत उपस्थित होते असे सांगितले. याची दखल घेत खडके यांनी अर्ज माघारी घेण्यासाठी 5 मिनिटांचा कालावधी दिला. मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्या वैशाली बनकर व उमेदवार सुहास टिंगरे हे भिमाले यांच्या निवडीचे अभिनंदन करून सभागृहाबाहेर पडले. यामुळे खडके यांनी भिमाले यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील राहणार: भिमाले
शहराच्या विकासासाठी सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत मार्गी लावणे. महापालिकेवर आर्थिक ताण येऊ न देता विविध मार्गांतून निधी उभारून नवे प्रकल्प आणणे. करवाढ न करता पुणेकरांना दिलासा देतानाच महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याला माझे प्राधान्य राहील, असे महापालिकेच्या स्थायी समितीचे नूतन अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सोमवारी स्पष्ट केले. भिमाले म्हणाले, पुणेकरांची गरज लक्षात घेऊन नवनवे प्रकल्प आणले जातील. पुण्याच्या विकासाचे ‘व्हिजन’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले असून, त्याला गती देण्याचा प्रयत्न राहील. शहरात 32 किलोमीटर मेट्रो धावत आहे. मेट्रोचा विस्तार केला जात आहे. समान पाणीपुरवठा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. जायका, विमानतळ विस्तारीकरण, ई-बसखरेदी आदी प्रकल्प वेगाने पुढे नेले जात आहेत. ‘विविध प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून महापालिकेला 1000-1200 कोटी रुपये येणे आहे. तातडीने हा निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे भिमाले यांनी सांगितले.