Pune Municipal Sanitation Workers Inquiry: पुणे महापालिकेत 71 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर चौकशीचे आदेश

पगार एका ठिकाणी आणि काम दुसरीकडे; कामकाजातील अनियमिततेवर सभेत गंभीर आरोप
Sanitation Workers
Sanitation WorkersPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामकाजावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‌‘पगार एका विभागातून आणि काम दुसऱ्या ठिकाणी‌’ अशा प्रकारामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग््रेासचे नगरसेवक दत्ता बहिरट यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत केला. याप्रकरणी 71 स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Sanitation Workers
Nasarapur Case: नसरापूर बाल अत्याचार व खून प्रकरणी विशेष न्यायालयात जलदगती सुनावणी सुरू

महापालिकेच्या सोमवारी झालेल्या मुख्य सभेत बहिरट यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील 71 कर्मचाऱ्यांची यादी सादर केली. संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून होत असला, तरी ते प्रत्यक्षात इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत काम करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बहिरट यांनी सभागृहात सांगितले की, घोले रोड परिसरात नियमित साफसफाई होत नसल्यामुळे अनेक भागांत घाणीचे सामाज्य निर्माण झाले आहे.

Sanitation Workers
Fundkar Fruit Orchard Scheme: फळबाग लागवडीसाठी 165 कोटींची तरतूद; 15 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात उपलब्ध कर्मचारी इतरत्र कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मूळ विभागातील मनुष्य बळावर अतिरिक्त ताण पडत आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करण्याची परवानगी कोणी दिली? त्यामागचे कारण काय होते? अधिकृत आदेश होते का? तसेच परवानगी नसल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? असे सवालही बहिरट यांनी उपस्थित केले. याशिवाय रिक्त जागांसाठी बदली कर्मचारी का उपलब्ध करून दिले नाहीत? याचाही जाब त्यांनी प्रशासनाला विचारला.

Sanitation Workers
RBI Cooperative Bank Rules: नागरी सहकारी बँकांसाठी आरबीआयच्या नियमांमध्ये मोठे बदल

या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्य सभेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. तसेच, इतर क्षेत्रीय कार्यालयांतही अशाच प्रकारे कर्मचारी कार्यरत आहेत का? याची माहितीही तपासली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sanitation Workers
Pune Chemists Bandh: ऑनलाइन औषध विक्रीविरोधात पुण्यात केमिस्टांचा देशव्यापी बंद यशस्वी

कामकाजातील विसंगती उघड होण्याची शक्यता

या चौकशीतून स्वच्छता विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि प्रत्यक्ष कामकाजातील विसंगती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत असताना या प्रकरणाकडे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news