Fundkar Fruit Orchard Scheme: फळबाग लागवडीसाठी 165 कोटींची तरतूद; 15 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानाचा लाभ; कृषी विभागाची मोठी घोषणा
Fruit Orchard
Fruit OrchardPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत चालूवर्षी एकूण 165 कोटी रुपयांच्या अनुदान रकमेची आर्थिक तरतूद केली असून, राज्यात यंदा सुमारे 15 हजार हेक्टरइतके फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी दिली. योजनेत विविध 16 बहुवार्षिक फळपिकांची आवश्यकतेनुसार कलमे, रोपांद्वारे लागवड करण्याची संधी असून, शंभर टक्के अनुदानावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Fruit Orchard
RBI Cooperative Bank Rules: नागरी सहकारी बँकांसाठी आरबीआयच्या नियमांमध्ये मोठे बदल

आर्थिक तरतुदीमध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी 150 कोटी रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10 कोटी रुपये तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 5 कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारमार्फत शंभर टक्के पुरस्कृत अशी ‌‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना‌’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ज्याद्वारे शेतीला फळबागांची जोड देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असून, त्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Fruit Orchard
Pune Chemists Bandh: ऑनलाइन औषध विक्रीविरोधात पुण्यात केमिस्टांचा देशव्यापी बंद यशस्वी

सन 2018-19 पासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, युवा शेतकऱ्यांसाठी रोजगारनिर्मिती करणे, पीक पद्धतीत बदल घडवून आणणे तसेच प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्‌‍या मालाच्या उत्पादनात वाढ करणे हा आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग््राामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र न ठरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

Fruit Orchard
Pune Municipal Corporation Reshuffle: पुणे महापालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल; 21 अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या

सन 2018-19 ते सन 2025-26 या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली आहे. गतवर्ष सन 2025-26 मध्ये सात हजार 706 हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण केली आहे. त्याचा लाभ नऊ हजार 681 लाभार्थ्यां शेतकऱ्यांना मिळाला आहे. योजनेअंतर्गत 148 कोटी 35 लाख रुपयांचा अनुदान निधी वितरीत केला असून, तो खर्च झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

Fruit Orchard
ISIS Module Pune: पडघा ते पुणे कथित ISIS मॉड्यूलमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान

आवश्यक कागदपत्रे व 16 फळपिके

शेतकरी लाभार्थ्यांच्या नावे सातबारा उतारा असणे आवश्यक असून, संयुक्त खातेदार असल्यास संबंधितांचे संमतिपत्र आवश्यक आहे. योजनेअंतर्गत आंबा, काजू, पेरू, चिक्कू, डाळिंब, सीताफळ, कागदीलिंबू, नारळ, चिंच, अंजिर, आवळा, कोकम, फणस, जांभूळ, संत्रा, मोसंबी या 16 बहुवार्षिक फळपिकांची आवश्यकतेनुसार कलमे-रोपांद्वारे लागवड करण्यास मान्यता आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाइनद्वारे अर्ज करावयाचे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news