Hubli Airport Work Fraud: हुबळी विमानतळाच्या कामात २.९८ कोटींचा घोटाळा; पुण्यातील बांधकाम कंपनीची फसवणूक

वर्क ऑर्डर मिळवून केवळ १५ ते २० टक्केच निकृष्ट काम; साहित्य पुरवठादारांची बिले हडपल्याचा आरोप, लातूरच्या कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा
Fraud
FraudPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: हुबळी विमानतळाच्या कामाची वर्क ऑर्डर मिळवून प्रत्यक्षात काम अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे करून तसेच साहित्य पुरवठादारांची बिले परस्पर हडप करून एका बांधकाम कंपनीची २ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कियान इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud
Payal Zambre Case: हुंडाबळी प्रकरणात पतीसह सासू-सासऱ्यांच्या कोठडीत वाढ; ३५ तोळे सोने जप्त, १५ तोळ्यांचा शोध सुरू

याबाबत सागर रायसोनी (वय ३८, रा. लोटस हाऊस, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कियान इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक कनिष्क त्र्यंबक कांबळे (रा. मुकुंद निवास, इंडियानगर, लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud
Lakshmi Pujan 2026: नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; दिवाळीचा आनंद द्विगुणित!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्क कांबळेने ए.टी.आर. इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीचा विश्वास संपादन करून कर्नाटकातील हुबळी विमानतळाच्या कामाची वर्क ऑर्डर मिळवली. मात्र, सुरुवातीपासूनच फसवणुकीचा हेतू ठेवून संबंधित काम अत्यंत संथगतीने सुरू केले. प्रत्यक्षात केवळ १५ ते २० टक्के काम पूर्ण केले.

Fraud
Maharashtra Migrant Nomadic Tribes Survey: महाराष्ट्रातील स्थलांतरित भटक्या-विमुक्त समाजाचे सर्वेक्षण होणार; शासनाकडून विशेष समिती स्थापन

तेही निकृष्ट दर्जाचे होते. कामात विलंब होण्याबाबत वेळोवेळी खोटी आणि वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने कंपनीचा विश्वास कायम ठेवला. दरम्यान, हुबळी येथील साहित्य पुरवठादारांनी कामाच्या ठिकाणी पुरविलेल्या साहित्याची बिले फिर्यादींच्या कंपनीने वेळेत अदा केली होती. मात्र, आरोपीने ही रक्कम संबंधित पुरवठादारांना न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.

Fraud
Maharashtra Sugarcane Crushing Season: राज्यात १३८ साखर कारखान्यांची धुराडी पेटली; १.३२ कोटी टन ऊस गाळप, १०.८७ लाख टन साखर उत्पादन

तसेच, कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता काम अर्धवट सोडून दिले. कंपनीने विश्वासाने दिलेल्या पैशांचा परस्पर अपहार करून एकूण दोन कोटी ९८ लाख ९ हजार ११८ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.