Pune Child Sabha: पुण्याच्या विकासाचे नियोजन आता विद्यार्थी करणार! १० क्षेत्रीय कार्यालयांत २७ नोव्हेंबरला बालसभा

५० शाळांमधील ५०० विद्यार्थी मांडणार शहराच्या विकासासाठी संकल्पना; व्यवहार्य सूचनांचा आगामी महापालिका अंदाजपत्रकात समावेश करण्याचा प्रयत्न
Child Sabha
Child SabhaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहराच्या विकासाचे नियोजन करताना आता शालेय विद्यार्थ्यांचाही आवाज महापालिकेच्या सभागृहात घुमणार आहे. रस्ते, वाहतूक, स्वच्छता, उद्याने, पर्यावरण अशा शहराशी संबंधित प्रश्नांवर विद्यार्थ्यांना काय वाटते आणि त्यांच्या मते त्यावर कोणते उपाय करता येतील, हे जाणून घेण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

Child Sabha
Pune Encroachment Drive: ‘प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांना अतिक्रमणे दिसली नाहीत का?’; महापौर मंजूषा नागपुरेंचा सवाल

येत्या २७ नोव्हेंबरला शहरातील १० क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'बालसभा' भरविण्यात येणार असून, यामध्ये ५० शाळांमधील ५०० विद्यार्थी अधिकारी आणि नगरसेवकांसमोर आपल्या संकल्पना मांडणार आहेत. विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या व्यवहार्य उपाययोजनांचा समावेश महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Child Sabha
Bhor Fire Incident: भोर तालुक्यात आगीचा तांडव; मादगुडेवाडीत तीन घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

शहराच्या नियोजन प्रक्रियेत मुलांचाही सहभाग असावा, या उद्देशाने माजी महापौर आणि माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे बालसभेची संकल्पना मांडली होती. पुणे क्लायमेट वॉरियरच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून विविध शाळांमध्ये पर्यावरण आणि जागतिक तापमानवाढीविषयी जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा विस्तार म्हणून बालसभेचे आयोजन करण्यात येत आहे.

Child Sabha
Maharashtra Public Libraries: राज्यातील ग्रंथालयांची श्रेणीवाढ १४ वर्षांपासून रखडली; तुटपुंज्या अनुदानामुळे आर्थिक संकट

महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, शहरात मुलांच्या दृष्टीने कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याची माहिती त्यांच्याकडूनच मिळणे महत्त्वाचे आहे. बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नागरी प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण होईल आणि भविष्यातील जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल.

Child Sabha
Pune Students Robotics Achievement: ग्रामीण विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानात भरारी! पुणे जिल्हा परिषद शाळेतील दोघांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यात प्रथमच अशा प्रकारे शहर व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात आहे. या बालसभेत प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या परिसरासाठी दोन आणि संपूर्ण शहरासाठी दोन अशा एकूण चार संकल्पना मांडणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी केवळ समस्यांचा पाढा वाचणार नाहीत, तर त्यावर उपाययोजनाही सुचविणार आहेत. शाळास्तरावर विद्यार्थ्यांची या सादरीकरणासाठी तयारी करून घेण्यात आली आहे. अॅड. चव्हाण यांनी हा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.