Maharashtra Public Libraries: राज्यातील ग्रंथालयांची श्रेणीवाढ १४ वर्षांपासून रखडली; तुटपुंज्या अनुदानामुळे आर्थिक संकट

‘क’ आणि ‘ड’ वर्गातील ग्रंथालयांची आर्थिक कोंडी; अनुदानात ४० टक्के वाढ आणि वेळेत निधी देण्याची ग्रंथालय चालकांची मागणी
Library
LibraryPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या दर्जा बदलाची (श्रेणीवाढ) प्रक्रिया २०१२ पासून रखडल्याने अनेक ग्रंथालये वर्षानुवर्षे त्याच वर्गवारीत अडकली आहेत. विशेषतः ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील ग्रंथालयांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, तुटपुंज्या अनुदानातून जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल आणि दैनंदिन खर्च भागवताना चालकांची दमछाक होत आहे. त्यात शासनमान्य ग्रंथालयांना दरवर्षी पुस्तक खरेदी करणे बंधनकारक असल्याने अनुदानाचा हप्ता उशिरा मिळाल्यानंतरही उसनवारी करून पुस्तके खरेदी करावी लागत आहेत.

Library
Pune Students Robotics Achievement: ग्रामीण विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानात भरारी! पुणे जिल्हा परिषद शाळेतील दोघांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

त्यामुळे दर्जा बदलाची प्रक्रिया सुरू करावी, अनुदानात ४० टक्के वाढ करावी आणि ते वेळेत द्यावे, अशी मागणी होत आहे. ग्रंथालयांना मिळणारे अनुदान त्यांच्या दर्जानुसार निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अनेक वर्षांपासून दर्जा बदललेला नसल्याने ग्रंथालयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Library
Pudhari Kasturi Club Deepotsav: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यात कस्तुरी क्लबचा भव्य दीपोत्सव; दिव्यांच्या प्रकाशात उजळले वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिर

सगळ्यात वाईट परिस्थिती ‘क’ आणि ‘ड’ दर्जाच्या ग्रंथालयांची असून, या दर्जातील ग्रंथालयांना मिळणारे अनुदान अत्यंत अपुरे आहे. ‘क’ दर्जा असलेल्या तालुकास्तरीय ग्रंथालयांना २ लाख ३० हजार ४०० रुपयांचे, तर ‘क’ दर्जा इतर ग्रंथालयांना १ लाख ५३ हजार ६०० रुपयांचे मानधन दिले जाते. तर ‘ड’ दर्जा असलेल्या ग्रंथालयांना ४८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. या रकमेत भाडे, वीजबिल, वर्तमानपत्रे, मासिके, कर्मचारी वेतन आणि पुस्तक खरेदीचा खर्च भागविणे अशक्य आहे. पुण्यासारख्या महानगरात जागेचे भाडे आणि देखभालीचा खर्च अधिक असल्याने ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील ग्रंथालयांची अडचण आणखी वाढली आहे.

Library
Devram Lande Resignation: कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप प्रकरणाला राजकीय वळण; देवराम लांडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

छत्रपती शिवाजी मुक्त वाचनालयाचे (पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) दिनकर चवरे म्हणाले, आमचे वाचनालय २६ वर्षांपासून ‘ड’ वर्गात आहे. वर्षाला ४८ हजार रुपये अनुदान मिळते. भाडे, वीजबिल आणि नियतकालिकांचा खर्च भागवताना पुस्तक खरेदी करणेही कठीण होते. तुटपुंज्या अनुदानात ग्रंथालयांचा खर्च भागवता येत नाही.

Library
Shirur Ganja Seizure: शिरूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; २५० किलो गांजा जप्त, किंमत दीड कोटींहून अधिक

यंदा अनुदान उशिरा मिळाल्याने पुस्तक खरेदीत अडचणी आल्या आहेत. मी दिव्यांग असूनही गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथालय चालविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बिबवेवाडीतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय आणि वाचनालयाचे अध्यक्ष राजू घाटोळे म्हणाले की, शहरात ग्रंथालय चालविणे सध्याच्या घडीला अडचणीचे ठरत आहे. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील ग्रंथालयांना मिळणारे अनुदान तुटपुंजे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.