PMC 32.83 Crore Proposal: 32.83 कोटींचा विकासनिधी प्रस्ताव जीबीमधून माघारी; महापालिकेत प्रशासकीय गोंधळ उघड

पर्वती मतदारसंघातील 21 कामांवरील निधी अखेर शेवटच्या क्षणी मागे; आयुक्तांकडून चौकशीचे संकेत
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पर्वती विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रस्तावित 32 कोटी 83 लाख रुपयांचा निधी अखेर उपसूचनेद्वारे मागे घेण्यात आला. स्थायी समितीने यापूर्वी मंजुरी दिलेला हा प्रस्ताव मुख्य सभेत अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता; मात्र, शेवटच्या क्षणी तो मागे घेण्यात आल्याने प्रशासकीय स्तरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune Municipal Corporation
Koregaon Sarpanch Attacked: भांडण सोडवायला गेलेल्या माजी उपसरपंचांसह तिघांवर दांडक्याने हल्ला; कोरेगाव खुर्दमध्ये खळबळ

महापालिका अधिनियम 72 (ब) अंतर्गत आयुक्तांच्या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या 21 विकासकामांसाठी उर्वरित निधी पुढील आर्थकि वर्षात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव होता. पर्वतीच्या आमदार तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघातील या कामांसाठी प्रशासनाने केवळ अंदाजपत्रकाच्या सुमारे 20 टक्के निधीचीच तरतूद केली होती. ही कामे पूर्ण होण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागणार असल्याने उर्वरित 80 टक्के म्हणजेच 32.83 कोटी रुपये 2026-27 च्या अंदाजपत्रकात राखून ठेवावेत, अशी शिफारस पथ विभागाने डिसेंबरमध्ये आयुक्तांकडे पाठवली होती.

Pune Municipal Corporation
Pune Cooperative Bank Gold Loan: बनावट सोन्याच्या तारणावर सुवर्णकर्ज; पुण्यात सहकारी बँकेची कोट्यवधींची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युएटरसह 42 जणांवर गुन्हा

या कामांचे पूर्वगणपत्रक तयार करून वित्तीय समितीची मान्यता घेण्यात आली होती. तरीदेखील आयुक्तांनी हा प्रस्ताव सलग पाच ते सहा महिने पुढे ढकलला. तत्कालीन पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही हा प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

Pune Municipal Corporation
National Cricket for Visually Impaired: दृष्टिहीनांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत गुजरात विजयी; कर्नाटकवर 20 धावांनी मात

कसा आला सभेत प्रस्ताव?

स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर हा विषय मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला. मात्र, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त दिवटे आणि तत्कालीन पथ विभागप्रमुख पावसकर यांनी हा प्रस्ताव सभेत कसा आला, याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनीच सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार उपसूचना मांडून प्रस्ताव एकमताने मागे घेण्यात आला. या घटनेमुळे आयुक्तांना माहिती न देता स्थायी समितीत विषय मंजूर होऊ शकतात आणि तेच सर्वसाधारण सभेतही येऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Pune Municipal Corporation
Pune ATS Fitness Testing: एटीएस केंद्राच्या दिरंगाईमुळे पुण्यात वाहनांचे पासिंग ठप्प; हजारो रिक्षा-बस अडकल्या

चौकशीची शक्यता

हा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी सादर झाला होता आणि तो मंजूर केला जाणार नसल्याचे वारंवार सांगण्यात आले होते. तरीही 6 फेबुवारी रोजी स्थायी समितीत त्यास मंजुरी मिळाल्याचे दिसून आले. आयत्या वेळी माहिती न देता प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला का, याची चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, अशा पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news