Koregaon Sarpanch Attacked: भांडण सोडवायला गेलेल्या माजी उपसरपंचांसह तिघांवर दांडक्याने हल्ला; कोरेगाव खुर्दमध्ये खळबळ

मटण दुकानातील वादाचे रूपांतर मारहाणीत; तिघे गंभीर जखमी, एमआयडीसी उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल प्रक्रियेत
Koregaon Sarpanch Attacked
Koregaon Sarpanch AttackedFile Photo
Published on
Updated on

भामा आसखेड : मटण शॉपचा मालक व कामगार यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गेलेले कोरेगाव खुर्द (ता.खेड) गावचे माजी उपसरपंच राजू झांबरे यांचेसह शरद बुट्टे व जालिंदर थोरात या तिघांना दोघांनी दांडक्याने जबर मारहाण केली. यात ते जबर जखमी झाले आहेत. ही घटना कोरेगाव खुर्द हद्दीतील कॉर्निंग इंडिया कंपनीच्या समोर बुधवारी (दि.18) रात्री घडली.

Koregaon Sarpanch Attacked
Pune Cooperative Bank Gold Loan: बनावट सोन्याच्या तारणावर सुवर्णकर्ज; पुण्यात सहकारी बँकेची कोट्यवधींची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युएटरसह 42 जणांवर गुन्हा

कोरेगाव खुर्द गावच्या सरपंच सीमा झांबरे यांचे पती व गावचे माजी उपसरपंच राजू झांबरे, तसेच कोरेगावचे शरद बुट्टे हे दोघे जालिंदर थोरात यांच्या पान टपरीवर थांबले होते. जवळच मटणाचे दुकान आहे. त्याचा मालक व कामगार यांच्यात भांडण सुरू होते. मालक कामगाराला बेदम मारहाण करीत होता. कामगाराचा आवाज ऐकून राजू झांबरे, शरद बुटे व जालिंदर थोरात यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.

Koregaon Sarpanch Attacked
National Cricket for Visually Impaired: दृष्टिहीनांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत गुजरात विजयी; कर्नाटकवर 20 धावांनी मात

यावर भांडण करणाऱ्या दोघांनी दांडके राजू झांबरे यांच्या डोक्यात घातले. त्यानंतर त्या दोघांनी बुट्टे यांनाही मारहाण केली. जालिंदर थोरात यांनाही मारले. यात कोरेगाव खुर्द गावच्या हद्दीत डुकराचा कत्तलखाना आहे. रविवारी वासुली फाटा येथे मोठा आठवडा बाजार भरतो. यात परप्रांतीय कामगारांकडून डुकराच्या मटणाला मोठी मागणी असते.

Koregaon Sarpanch Attacked
Pune ATS Fitness Testing: एटीएस केंद्राच्या दिरंगाईमुळे पुण्यात वाहनांचे पासिंग ठप्प; हजारो रिक्षा-बस अडकल्या

हे गाव एमआयडीसी उत्तर पोलिस ठाणे हद्दीत आहे. याबाबतची तक्रारदारांच्या फियार्दीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी उत्तर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news