Pune Municipal Budget 2026: पुणे महापालिकेचा 15,669 कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प; 140 योजनांचा समावेश

महिलांना करसवलत, ज्येष्ठांना पीएमपी सवलत, रोप-वे ते कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत मोठ्या घोषणा
Pune Municipal Budget 2026
Pune Municipal Budget 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिका निवडणुकीनंतर सादर झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच अंदाजपत्रकात योजनांचा नव्या-जुन्यांसह तब्बल 140 योजनांचा समावेश आहे. अशी विक्रमी योजना असलेले स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी 2026-27 या आर्थिक वर्षांचे 15 हजार 669 कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेला सादर केले. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात तब्बल 1 हजार 674 कोटींची वाढ भिमाले यांनी केली आहे.

Pune Municipal Budget 2026
Share Market Fraud: शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला घोडेगाव पोलिसांकडून अटक

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीला 13 हजार 995 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात स्थायी समिती अध्यक्षांनी अनेक नवीन योजना, प्रकल्प यांचा समावेश करत प्रशासनाने धरलेल्या अपेक्षित उत्पन्नांमध्ये मोठी वाढ अपेक्षित धरत 15 हजार 663 कोटींचे आत्तापर्यंतचे सर्वाधिक रकमेचे अंदाजपत्रक सादर केले. भिमाले यांच्या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे या अंदाजपत्रकात योजनांचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

Pune Municipal Budget 2026
Tuberculosis Control Programme: पुण्यात क्षयरोग नियंत्रणासाठी निक्षय योजना व एआय आधारित तपासणी मोहीम

महिलांच्या मालकी हक्काच्या घरांना 50 टक्के मिळकतकर माफी, ज्येष्ठांना पीएमपी प्रवासात 50 टक्के सवलत, महिलांसाठी कन्व्हेन्शन सेंटर, विद्यार्थ्यांसाठी पिंक रूम, महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह, देशातील पहिली वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणा, 50 लाख वृक्ष लागवड, शहरी जलयुक्त योजना, नमो गार्डन, मिरॅकल गार्डन, महापालिकेचे डेटा सेंटर, एआय आधारित डीबीटी पोर्टल, 75 रोल मॉडेल स्कूल, सारसबाग ते पर्वती रोप-वे, सारसबागेत काचेचा पूल, बाणेर येथे कॅन्सर हॉस्पिटल अशा नावीन्यपूर्ण योजनांचा या अंदाजपत्रकात समावेश आहे.

Pune Municipal Budget 2026
Pune Zilla Parishad Development Works: जिल्ह्यातील रस्त्यांची कामे 25 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी सुचविलेल्या मिळकतकर, बांधकाम परवानगी, पाणीपट्टी, शासकीय अनुदान अशा प्रमुख उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये भिमाले यांनी आणखी वाढ सुचविली आहे. आयुक्तांनी मिळकतकरातून 3 हजार 352 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्यात भिमाले यांनी आणखी 530 कोटींची वाढ अपेक्षित धरून 3 हजार 882 कोटींचे उत्पन्नाचे उद्दिष्टे निश्चित केले आहे, तर बांधकाम परवानगीत 300 कोटी, शासकीय अनुदानात 500 कोटी आणि इतर जमेत 344 कोटींची इतकी वाढ आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा अधिक धरून 1 हजार 674 कोटींचा वाढीव रकमेचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. समाविष्ट गावे, त्यामधील मिळकतकराचे उत्पन्न, बांधकाम परवानग्या, अनधिकृत केबल व होर्डिंग या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळेल, असा दावा भिमाले यांनी केला आहे.

Pune Municipal Budget 2026
Maharashtra Section 155 Land Revenue: कलम 155 गैरवापर प्रकरणात पुण्यात 152 दोषी अधिकाऱ्यांना नोटिस

स्थायी समितीने सादर केलेला हा अर्थसंकल्प विकासकामांवर भर देणारा आहे. महसूलवाढीसाठी नव्या मार्गांचा शोध घेतला आहे. शहरासाठी आरोग्य, शिक्षण, पीएमपी, महिलांचे सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांसाठी भरीव तरतूद केली आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर आहे. समाविष्ट गावांसह संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलणारा हा अर्थसंकल्प आहे.

श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news