Pune municipal budget 2026-27: पुणे महापालिकेचे 2026-27 चे अंदाजपत्रक 30 जानेवारीपर्यंत; रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठ्यावर भर

निवडणूक प्रक्रियेमुळे विलंब; सुमारे 1,500 कोटींच्या अंदाजपत्रकात मूलभूत सुविधांना प्राधान्य
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश असलेले महापालिकेचे सभागृह लवकरच अस्तित्वात येणार असून, महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या 30 जानेवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. आगामी अंदाजपत्रकात रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्त्यांचा विकास, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Pune Municipal Corporation
Pune Builder Consumer Court Order: गृहकर्जाची कागदपत्रे न दिल्याने बांधकाम व्यावसायिकाला दणका

महापालिकेचे अंदाजपत्रक सर्वप्रथम आयुक्तांकडून तयार करण्यात येते. यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबरअखेरपर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न, पुढील तीन महिन्यांत म्हणजे मार्चअखेरपर्यंत अपेक्षित उत्पन्न, तसेच शासनाकडून मिळणारा निधी यांचा समावेश असतो. नियमानुसार साधारणतः 20 जानेवारीपूर्वी आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करणे अपेक्षित असते. त्यानंतर स्थायी समितीकडे हे अंदाजपत्रक सादर करण्यात येते आणि स्थायी समिती अंतिम निर्णय घेऊन ते सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर करते. मात्र, यंदा 15 डिसेंबरपासून सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे तसेच त्यापूर्वी प्रभाग रचना आणि मतदार याद्यांच्या कामामुळे अंदाजपत्रक विहीत मुदतीत सादर करणे शक्य झाले नाही.

Pune Municipal Corporation
Pune Municipal Election Analysis: धानोरी-कळस-लोहगाव प्रभाग १ : इतिहासाची पुनरावृत्ती, टिंगरे कुटुंबाचा दबदबा कायम

यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, निवडणुकीमुळे अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देता आले नाही. मात्र, येत्या 30 जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केले जाईल. सायकल स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, सुमारे दोन हजार चेंबर्स समपातळीत करण्यात आले आहेत.

Pune Municipal Corporation
Bajaj Pune Grand Tour 2026: बजाज पुणे ग्रँड टूर-2026: प्रोलॉग रेसने पुण्यात रंगला आंतरराष्ट्रीय सायकल महोत्सव

पुढील वर्षभरात शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच सुमारे 40 हजार चेंबर्स समपातळीत करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. काही ठिकाणी पावसाळी गटारांचे चेंबर्स समपातळीत करण्याला प्राधान्य दिले जाईल. शहर स्वच्छ ठेवणे आणि सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कार्यान्वित करणे, हेही प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

Pune Municipal Corporation
Pune Jilha Parishad Ajit Pawar: पुणे जिल्हा परिषद अजित पवारांचाच गड; तो त्यांचाच राहील : दत्तात्रय भरणे

अनुदानाचाही अंदाजपत्रकात समावेश असणार

महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचे असण्याची शक्यता असून, शासनाकडून समाविष्ट गावांसाठी मिळणारा सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा जीएसटी, मुद्रांक शुल्क अधिभार तसेच विविध योजनांमधील अनुदानाचाही या अंदाजपत्रकात समावेश असणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news