Pune Mumbai missing link: 32 तासांची कोंडी अन् प्रश्नचिन्ह; पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ कधी पूर्ण?

आडोशीतील टँकर अपघातानंतर प्रकल्पातील विलंब चर्चेत; केबल ब्रिजचे काम एप्रिलपर्यंत रखडण्याची शक्यता
Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expresswayदहापदरीpudhari photo
Published on
Updated on

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी येथे गॅस टँकर पलटी झाल्याने सुमारे 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. या महामार्गावर आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढ्या वेळ वाहतूक कोंडी झाल्याने मिसिंग लिंक प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. नियोजित वेळेनुसार हा प्रकल्प डिसेंबरअखेरपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, तो आता वाहतुकीसाठी खुला होण्यास मे महिना उजाडणार आहे. दरम्यान, याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या केबल बिजचे कामास तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला आहे. हे काम पूर्ण होण्यास एप्रिल महिना उजाडू शकतो. अशी माहिती रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली.

Mumbai-Pune Expressway
Swapnali Pandit corporator: संघ-संस्कारातून सभागृहापर्यंत; स्वप्नाली पंडितांचा नगरसेविकेपर्यंतचा प्रवास

लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी-बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून, या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून, प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

Mumbai-Pune Expressway
Hadapsar Ward election result: हडपसर-सातववाडीत तिसऱ्या पॅनेलचा फटका; राष्ट्रवादीचे वर्चस्व ढासळले, उबाठाची एंट्री

या प्रकल्पातंर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठपदरी नवीन रस्ता बांधण्यात आला आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे. मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक कि.मी. लांबीचा एक बोगदा असून, पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वात मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ कि.मी. लांबीचा बोगदा तयार केला आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम या पूर्वीच पूर्ण झाले आहे, तर याच प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या केबल बिजची लांबी 645 मीटर आणि उंची 210 मीटर असणार आहे. त्यामध्ये 130 मीटर उंचीवरील पुलावर स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात.

Mumbai-Pune Expressway
Municipal Procurement Scam: महापालिकेत दोन कोटींच्या साहित्यखरेदीत घोटाळा; 20 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम ‌’एमएसआरडीसी‌’ने हाती घेतले. या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 कि.मी. वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या आशिया खंडातील सर्वाधिक उंच म्हणजे 130 मीटर उंचीच्या केबल बिजवर स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीची कोंडी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. असे एमएसआरडीसी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news