

पुणे: एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन गुरुवारी (दि. ८) सातव्या दिवशीही सुरूच राहिले.
आंदोलनस्थळी दिवसभर विद्यार्थ्यांची गर्दी, घोषणाबाजी आणि सरकारसोबतच्या चर्चेबाबत उत्सुकता असे वातावरण होते. दरम्यान, अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करावे लागलेले दोन विद्यार्थी उपचारानंतर पुन्हा आंदोलनात सहभागी झाले.
एस. एम. जोशी पूल परिसरात सुरू असलेल्या आंदोलनात ऋषिकेश गांगुर्डे, शिवराज मोरे, ओंकार पाटील, प्रियंका चौधरी, सोमनाथ, गजानन शेळके, नितीन गीते आणि शीतल यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी गांगुर्डे आणि शेळके यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे दोघांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, उपचारानंतर प्रकृती सुधारताच दोघेही पुन्हा आंदोलनस्थळी परतले.
पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही आंदोलक ठाम
आंदोलनस्थळी पोलिसांनी घोषणा करून जागा रिकामी करण्याचे संकेत दिले. मात्र, रोहित पवार यांनी आक्रामक भूमिका घेत ‘विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही.
पोलिसांनी बळजबरीने उठविण्याचा प्रयत्न केल्यास लोकमान्य टिळक चौकात ठिय्या मांडू,’ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आंदोलकांनीही पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. ‘याच ठिकाणी आंदोलनासाठी सुरुवातीला परवानगी दिली होती. मग आता जागा रिकामी करण्याचा आग्रह का?’ असा सवाल त्यांनी केला.
आंदोलनस्थळी नाना पाटेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार
आंदोलनस्थळी अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलनस्थळी त्यांच्या छायाचित्रासह श्रद्धांजलीचा फ्लेक्सही लावण्यात आला. यावेळी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाना पाटेकर यांच्या आठवणींना आमदार रोहित पवार यांनी उजाळा दिला.
दरम्यान, रात्री आंदोलनस्थळी भाषणे थांबविण्यात आली.हक्कांसाठी लढताना तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नका. तुमचा संघर्ष इतका व्यापक करा, की सरकारची तुरुंगव्यवस्थाही अपुरी पडेल. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रोहित पवार तुमच्यासोबत उभे आहेत; तुम्हीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा.
विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, आपल्या हक्कांसाठी त्यांनी उभारलेले आंदोलन रास्त आहे. आमदार, खासदारफुटीपेक्षा पेपर फुटल्याचा विषय विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागला आहे. सर्व स्पर्धा परीक्षा नाममात्र शुल्कात घेण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना उपोषण करावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे. या प्रकाराला नैतिकदृष्ट्या जबाबदार असलेल्यांनी राजीनामा द्यावा.
- राजेश टोपे, माजी आरोग्यमंत्री
देशात संविधान सर्वतोपरी आहे. त्यामुळे आमच्या सहनशीलतेचा फार अंत पाहू नका. सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुर्दैवाने लोकशाहीत आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकारांसाठी लढा द्यावा लागत आहे. हा लढा आम्ही अहिंसेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून देत आहोत. मात्र, आमचे हक्क दिले जात नसतील, तर ते हिसकावून घेण्याची ताकदही तरुणाईमध्ये आहे.
- भाई जगताप, काँग्रेस नेते.
हक्कांसाठी लढताना तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नका. तुमचा संघर्ष इतका व्यापक करा, की सरकारची तुरुंगव्यवस्थाही अपुरी पडेल. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रोहित पवार तुमच्यासोबत उभे हक्कांसाठी लढताना तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नका. तुमचा संघर्ष इतका व्यापक करा, की सरकारची तुरुंगव्यवस्थाही अपुरी पडेल. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रोहित पवार तुमच्यासोबत उभे आहेत; तुम्हीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा.
- बी. जी. कोळसे पाटील, माजी न्यायमूर्ती राहा.