Pune Metro Phase 2 Expansion: मेट्रो टप्पा-2 मंजूर; हडपसर-लोणी, सासवड व वाघोलीपर्यंत विस्तार

पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत हडपसर-लोणी काळभोर, हडपसर बस डेपो-सासवड रोड आणि रामवाडी-वाघोली मार्गांना मंजुरी. अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद; वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे मेट्रो टप्पा-2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारकडून शुक्रवारी (दि. 6) रोजी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरातील मेट्रोमार्गांबरोबर आता शहराबाहेरही मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांची कोंडीतून सुटका होण्यासाठी फायदा होणार आहे.

Pune Metro
Pune AI Property Search Platform: क्रेडाई पुणेचे ‘Credaibility.AI’: AI-आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून, त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहेत. या दोन्ही उपमार्गिका पूर्णत: उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे आणखी विस्तारित होणार आहे.

Pune Metro
Khor Yatra Wrestling Event: यात्रेनिमित्त कुस्ती आखाड्यात 92 देशांत थेट प्रक्षेपण

शहराच्या पूर्व परिसरासह ग््राामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. तसेच हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे मल्टिलेव्हल इंटेग््रेाशन करून पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे. आता हडपसर बस डेपो ते सासवड रोडपर्यंत राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याने मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे, तसेच थेट सासवडपर्यंत मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच, राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 कि.मी.पर्यंत नेण्याचे नियोजन देखील केले जात आहे.

सासवडकरांची पुण्याशी वाढणार थेट कनेक्टिव्हिटी

मेट्रोच्या झालेल्या या विस्तारीकरणाबाबत पुणेकर आणि सासवडकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सासवडचे के. डी. गिरमे, अरुण भाबड, संभाजी फडतरे, बाबूराव फडतरे, श्रीधर जगताप म्हणाले, शासनाने अर्थसंकल्पात मेट्रो विस्ताराला सासवडपर्यंत मंजुरी दिल्यामुळे सासवडकर नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सासवडकरांची आणि पुणेकरांचीही थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. परिणामी, व्यापार, उद्योग क्षेत्र वाढणार असून, हा भाग आणखी मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहे. तसेच, पुणेकरांसह इतरांनाही येथे होणाऱ्या पुरंदर विमानतळापर्यंत येण्या-जाण्यासाठीचा मार्ग अधिक सोपा होणार आहे.

Pune Metro
Maharashtra Budget 2026: हडपसर-यवत सहापदरी उड्डाणपूल 5,262 कोटी मंजुरी

रामवाडी ते वाघोली नवे मेट्रोमार्ग

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये रामवाडी ते वाघोली असा 11 कि.मी. लांबीच्या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे अहिल्यानगर मार्गावरील रामवाडीपासून आता ही मेट्रो वाघोलीपर्यंत जाणार आहे. या नव्या मागार्मुळे नगर रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीतून वाट काढत शहराच्या मध्यभागात कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद

शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात पुण्यातील टप्पा 2 मधील मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे. यामुळे पुण्यातील मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. भविष्यात या विस्तारलेल्या मेट्रो मार्गिकांच्या जाळ्यामुळे शहरातील कनेक्टिव्हीटी वाढणार असून, वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त पुणे शहर होण्यासही मोठा हातभार लाभणार आहे. याकरिता अर्थसंकल्पात एकूण 500 कोंटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

Pune Metro
Maharashtra Budget 2026: चांडगाव-पोमलवाडी उजनी पूलासाठी 340 कोटी मंजुरी

54 किमी नवीन भुयारी मार्गाचा डीपीआर....

अर्थसंकल्पात मिळालेल्या मेट्रो मार्गिकांच्या मंजुरीमुळे पुण्यातील मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारणार आहे. याचसोबत येरवडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या 54 कि.मी.च्या दुहेरी भुयारी मार्गाचा डीपीआर तयार करण्यात येत आहे.

राज्याच्या या अर्थसंकल्पात पुण्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी, तळेगाव चाकण एलिव्हेटेड मेट्रो, मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन तसेच पुणे-लोणावळा तिसऱ्या रेल्वेमार्गासारख्या निर्णयांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा तसेच बारामती विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय ही महत्त्वाचा आहे. तसेच नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पामुळे बारामती आणि पुरंदरमधील दुष्काळग््रास्त भागातील पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

रोहन सुरवसे, राष्ट्रवादी काँग््रेास पार्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news