Pune AI Property Search Platform: क्रेडाई पुणेचे ‘Credaibility.AI’: AI-आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म

क्रेडाई पुणेकडून ‘Credaibility.AI’ हा AI-आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म सादर. 400 पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी; बनावट लिस्टिंग टाळून घरखरेदीदारांना थेट डेव्हलपरकडून अचूक माहिती
Credaibility.AI
Credaibility.AIPudhari
Published on
Updated on

पुणे: रिअल इस्टेट क्षेत्रातील अग््राणी संस्था क्रेडाई, पुणे यांच्या वतीने जगातील पहिले एआय-आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म ‌‘CREDAIBILITY.AI’ सादर करण्यात आले आहे. घरखरेदीदारांना मालमत्ता शोधणे सोपे जाणार आहे.

Credaibility.AI
Khor Yatra Wrestling Event: यात्रेनिमित्त कुस्ती आखाड्यात 92 देशांत थेट प्रक्षेपण

सध्या या ॲपवर 400 हून अधिक प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली असून, लवकरच ही संख्या 800 पेक्षा अधिक करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरासाठी मालमत्ता शोधण्याचे सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. अनेक प्रॉपर्टी पोर्टल्सवर बनावट नोंदी असतात, एकाच प्रकल्पाच्या अनेक नोंदीही दिसून येतात. स्पॅम कॉल्स आणि डेटाचा गैरवापर यांसारख्या समस्यांवर या ॲपमुळे नियंत्रण मिळते. याशिवाय ग््रााहकांना एक विश्वासार्ह व्यासपीठ मिळते.

Credaibility.AI
Maharashtra Budget 2026: हडपसर-यवत सहापदरी उड्डाणपूल 5,262 कोटी मंजुरी

या प्लॅटफॉर्मवर केवळ क्रेडाई पुणेच्या पडताळणी झालेल्या सदस्य डेव्हलपर्सचेच प्रकल्प दाखवले जातात. प्रत्येक प्रकल्पाची अधिकृत आणि एकमेव लिस्टिंग थेट डेव्हलपरकडून प्रकाशित केली जाते. शोधप्रक्रियेत मधले अनावश्यक दुवे कमी होतात. त्यामुळे घरखरेदीदारांना थेट विकासकांकडून अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Credaibility.AI
Maharashtra Budget 2026: चांडगाव-पोमलवाडी उजनी पूलासाठी 340 कोटी मंजुरी

असे करते एआय काम...

या ॲपमध्ये आपल्या सोप्या भाषेत शोध घेण्याची सुविधा आहे. उदाहरणार्थ, “बाणेरमध्ये मेट्रो जवळ 90 लाखांखाली 2 बीएचके” अशा साध्या वाक्यात शोध घेतल्यास एआय तंत्रज्ञान बजेट, जीवनशैली, लोकेशन आणि कनेक्टिव्हिटीच्या आधारे योग्य मालमत्ता सुचवते.

Credaibility.AI
UPSC Results Manobal Students: दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील 19 विद्यार्थ्यांचे यूपीएससी मध्ये यश

स्पॅम कॉल्स आणि डेटा सुरक्षितता

या प्लॅटफॉर्मची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, अनावश्यक लीड्‌‍स आणि अनावश्यक कॉल्स कमी होतात. त्यामुळे घरखरेदीदारांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीयता जपणारा संवादाचा पर्याय उपलब्ध होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news