Pune Metro Solar Energy: पुणेरी मेट्रो लाईन ३चा हरित ऊर्जेकडे मोठा टप्पा; ९ स्थानके आणि डेपोवर सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण

संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या वीज गरजेपैकी ३३ टक्के वीज सौरऊर्जेतून; दरवर्षी १ कोटी युनिट स्वच्छ वीजनिर्मिती
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पुणे: पुणेरी मेट्रोलाइन ३ तर्फे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात हरित ऊर्जेचा समावेश केला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने अवघ्या तीन महिन्यांत नऊ स्थानके आणि मेट्रो डेपोवर सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण केली आहे. ही सर्व स्थानके मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

Pune Metro
Sant Sopandev Maharaj Palkhi: सासवडमध्ये संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

पुणेरी मेट्रो ही आपल्या एकूण वीज गरजेपैकी जवळपास एकतृतीयांश वीज सौरऊर्जेतून निर्माण करणार आहे. मेट्रोच्या सर्व २३ स्थानकांवर आणि डेपोवर एकूण ७.६७ मेगावॅट पीकक्षमतेची रूफटॉप सौरऊर्जा प्रणाली उभारण्यात येत असून, हा प्रकल्प राज्यातील सर्वांत मोठ्या सौरऊर्जेवर आधारित शहरी सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक ठरणार आहे.

Pune Metro
Baramati Rainfall Shortage: बारामतीत पावसाची प्रतीक्षा कायम; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

संपूर्ण सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे १ कोटी युनिट (१४ दशलक्ष किलोवॅट-तास) स्वच्छ वीजनिर्मिती होईल. यामुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच मेट्रोच्या कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होणार आहे.

Pune Metro
Alandi Flood Warning: आळंदीत पूरस्थिती गंभीर; वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन

स्थानकांची छते आणि डेपोवरील उपलब्ध जागेचा प्रभावी वापर करून ही सौरऊर्जा प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने वीजखर्चातही मोठी बचत होणार आहे. संपूर्ण प्रकल्प उभारणीनंतर पुणेरी मेट्रोच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे ३३ टक्के वीज सौरऊर्जेतून उपलब्ध होणार आहे.

Pune Metro
Bhama Asakhad River Flood: भामा आसखेडमध्ये पूराचा तडाखा; दुचाकीसह व्यक्ती वाहून गेला, शोधमोहीम सुरू

शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतूकव्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तसेच, देशाच्या अक्षयऊर्जा धोरणाशी सुसंगत राहून आधुनिक शहरी वाहतूक प्रकल्पांमध्ये स्वच्छ ऊर्जेचा प्रभावी वापर करण्याचे हे उत्तम उदाहरण ठरणार आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news