Pune Tree Cutting Controversy: महापौर बंगल्यात 19 झाडांची कत्तल; चौकशीचे आदेश

वृक्षसंवर्धन विभागावर संशय; आयुक्त नवल किशोर राम यांचा कठोर पवित्रा
Tree Cutting
Tree CuttingPudhari
Published on
Updated on

पुणे: महापौर बंगल्याच्या आवारात 19 वृक्षांची करण्यात आलेली ‌‘कत्तल‌’ आता महापालिका प्रशासनाला भोवण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात दैनिक ‌‘पुढारी‌’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. वॉर्ड ऑफिस स्तरावर माहिती घेऊन याप्रकरणी तातडीने खुलासा करावा आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे फर्मान आयुक्तांनी दिल्याने वृक्ष संवर्धन समितीमधील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Tree Cutting
Bhor Village Issue: भोर तालुक्यातील धानवली गावात रस्ता नाही; आदिवासींची जीवघेणी पायपीट

पुण्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महापालिका 50 लाख झाडे लावण्याचे नियोजन करत आहे. मात्र, दुसरीकडे महापौर बंगल्यातील झाडे खराब झाल्याचे व त्यांच्यावर कीड पडल्याची कारणे देत 19 डेरेदार वृक्षांची फांद्या छाटणीच्या नावाखाली कत्तल करण्यात आली. महापौर बंगल्यातील निलगिरी, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, उंबर अशा 19 वृक्षांची फांद्या छाटणीच्या नावाखाली बुंध्यापासून तोडण्यात आली आहे.

Tree Cutting
Veer Temple Women Entry: वीर मंदिरात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर निर्णय

12 मार्चला वृक्ष संवर्धन विभागाचे हॉर्टीकल्चर मिस्त्री रवींद्र कांबळे यांनी प्रस्ताव मांडला आणि दुसऱ्याच दिवशी 13 मार्चला सहायक आयुक्तांनी त्याला मंजुरीही दिली. विशेष म्हणजे, ज्या विभागावर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी आहे, त्याच विभागाने स्वतःच पुढाकार घेऊन ‌’धोका‌’ असल्याचे भासवून ही कारवाई केल्याने संशयाची सुई प्रशासनाकडे वळली आहे. या घटनेचे वृत्त दैनिक ‌‘पुढारी‌’ने देऊन या प्रकरणाला वाचा फोडली होती.

Tree Cutting
Manikdoh Dam Water Level: माणिकडोह धरण 7% वर; जुन्नर परिसरात पाणीटंचाईची भीती

याची दखल घेत वृक्षप्रेमींनी देखील प्रशासनाला धारलेवर धरले होते. प्रत्यक्षात भवन विभागाने अर्ज करणे अपेक्षित असताना वृक्ष संवर्धन विभागाने दाखवलेली ही ‌‘तत्परता‌’ नेमकी कोणासाठी होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. याबाबत भवन विभागाचे प्रमुख बिपीन शिंदे यांना विचारले असता त्यांनी असा कोणताही आदेश दिले नसल्याचे सांगितले.

Tree Cutting
Baramati Water Scarcity: बारामतीत पुन्हा पाणीटंचाईचे सावट; 18 गावांकडून टँकरची मागणी

पत्रकारांना मज्जाव; गुन्हा दाखल करण्याची होती तयारी

झाडांच्या कत्तलीचे वृत्त प्रसिद्ध होताच महापौर बंगल्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पाहणी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरक्षा विभागाने केली होती. रात्री 12 पर्यंत सुरक्षा अधिकारी पोलिस चौकीत बसून होते. मात्र, वरिष्ठांच्या सूचनेनंतर अधिकारी माघारी फिरले. दरम्यान, मंगळवारी काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

‌‘छायाचित्रांवरून तरी ही झाडे चुकीच्या पद्धतीने तोडल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कत्तल का करण्यात आली, याची सखोल माहिती घेतली जाईल.‌’

नवल किशोर राम, आयुक्त महापालिका

‌‘केवळ फांद्या छाटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. जर झाडे पूर्णपणे तोडण्यात आली असतील तर संबंधित दोषींवर चौकशीअंती निश्चितपणे कारवाई केली जाईल.‌’

ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news