

बारामती: गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त राहिलेल्या बारामती तालुक्यात यंदा तीव उष्णतेमुळे पुन्हा पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. जिरायती भागातील ग््राामपंचायतींकडून टँकरची मागणी सुरू झाली असून, एप्रिलअखेर पाणीपातळीत झालेल्या घटामुळे सुमारे 18 गावांनी पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. तसेच, 13 गावांचे टंचाईग््रास्त प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सभापती किरण तावरे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची कामे, ग््राामस्थांचे सामूहिक प्रयत्न आणि समाधानकारक पावसामुळे बारामतीतील पाणीस्थिती सुधारली होती. ओढे-नाले, विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणीपातळी टिकून राहिल्याने टँकरची गरज भासली नव्हती. त्यामुळे ’टँकरवर अवलंबून असणारा तालुका’ ही ओळखही मागे पडली होती.
मात्र, यंदा वाढत्या उष्णतेमुळे जलस्रोत आटू लागले असून, परिस्थिती पुन्हा गंभीर होत आहे. पूर्वी दरवर्षी 20 ते 35 गावांतील सुमारे 50 हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. काही वर्षांपूर्वी टँकरची संख्या शंभरी पार करीत होती; मात्र गेल्या पाच वर्षांत परिस्थिती नियंत्रणात आली होती. जलजीवन योजनेअंतर्गत हाती घेतलेली कामे आणि नियोजनामुळे परिस्थितीत सुधारणा झाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर त्यांच्या हयातीत दुष्काळी हा शिक्काच पुसून टाकण्यासाठी जलजीवन योजनेंतर्गत मोठी कामे तालुक्यात हाती घेतली होती.
त्यांच्या अकाली जाण्याने सध्या ही कामे थोडी थंडावली आहेत. सध्या निधीअभावी अनेक पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्या असून, ठेकेदार अडचणीत आले आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर तालुक्यातील 23 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे तावरे यांनी सांगितले. मे महिन्यात टँकरची गरज आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा उन्हाची तीवता अधिक असल्याने जिरायतीबरोबरच बागायती भागांतूनही टँकरची मागणी वाढली आहे. 18 गावांचा प्रस्ताव सादर केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ग््राामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार टंचाईस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
किरण तावरे, सभापती, बारामती पंचायत समिती