Pune Market Yard Vegetable Rates: दहीहंडीच्या जल्लोषानंतर पुणे मार्केट यार्डात भाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्या स्वस्त

९० ट्रकमधून शेतमालाची आवक; करडई, अंबाडी, चुका आणि चवळईच्या भावात घट
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: शहरात शनिवारी दिवसभर दहीहंडीचा उत्साह आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या जल्लोषामुळे रविवारी किरकोळ खरेदीदारांची बाजारातील वर्दळ तुलनेने कमी राहिली. त्यामुळे तरकारी विभागात सर्व प्रकारच्या फळभाज्यांना साधारण मागणी राहिली.

Vegetable
Pune Market Yard Fruit Rates: पुणे मार्केट यार्डात मोसंबी-संत्र्यांची आवक वाढली; ड्रॅगन फ्रूट, पपई महागली

रविवारी बाजारात राज्यासह परराज्यातून सुमारे ९० ट्रकमधून विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. आवक आणि मागणी यांच्यात समतोल राहिल्याने बाजारात कोणत्याही प्रमुख फळभाजीच्या दरात मोठी चढ-उतार झाली नाही. परिणामी, गत आठवड्याच्या तुलनेत सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.

Vegetable
Pune Market Yard Rates: डाळी महागल्या, साखर स्वस्त; पुणे मार्केट यार्डात तूरडाळीचे दर वाढले

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून हिरवी मिरची १८ ते २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, इंदूर येथून गाजर १३ ते १४ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ ते ३ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ४ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा २ टेम्पो, बेंगलोर येथून २ टेम्पो आले, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ५० क्रेट, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ४० ते ४५ टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Pune Fish Market Rates: श्रावणामुळे मासळीची मागणी घटली; गणेश पेठ बाजारात दर स्थिर

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, मटार ३०० गोणी, पावटा १ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा २ टेम्पो, कांदा सुमारे ८० ते ९० टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Pune Noise Pollution: पुणेकरांच्या कानावर वर्षभर ध्वनिप्रदूषणाचा मारा; स्वारगेटमध्ये ८५.५ डेसिबलची नोंद

करडई, अंबाडी, चुका, चवळईच्या भावात घट

गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. ६) पालेभाज्यांची आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अधिक राहिल्याने करडई, अंबाडी, चुका आणि चवळईच्या भावात घट झाली. अन्य पालेभाज्यांचे भाव मात्र गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी बाजारात कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक एक लाख जुडींनी घडली, तर मेथीची आवक १० हजार जुडींनी वाढली. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या गड्डीला ३ ते १५ रुपये भाव मिळाला. तर किरकोळ बाजारात ५ ते २५ रुपये दराने विक्री सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news