Pune Market Yard Controversy: पुणे मार्केट यार्डातील बटाटा शेडमध्ये गॅस वितरण?; बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

शेतकऱ्यांसाठी उभारलेली सुविधा खासगी वापरात गेल्याचा आरोप; अतिक्रमण हटवण्याची मागणी जोरात
Pune Market Yard Controversy
Pune Market Yard ControversyPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी उभारण्यात आलेल्या बटाटा शेडचा वापर आता मूळ उद्देशापासून भरकटल्याचे समोर आले आहे. बटाट्याची आवक उतरविण्यासाठी उभारण्यात आलेल्या या शेडमध्ये सध्या गॅस वितरणाचे काम सुरू असल्याने बाजार समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही संचालकांच्या आशीर्वादानेच हे अतिक्रमण सुरू असल्याची चर्चा मार्केट यार्ड परिसरात रंगली आहे.

Pune Market Yard Controversy
Pashan Pune: पाषाणमध्ये बालाजी चौकात वाहतूक कोंडी! रहिवाशांच्या महापालिका-पोलिसांकडे या 4 मागण्या

कांदा-बटाटा विभागात मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने अतिरिक्त माल उतरविण्यासाठी जागेची आवश्यकता भासत होती. त्यासाठी बाजार समितीने जनावरांच्या बाजारालगतच्या मोकळ्या जागेत विशेष बटाटा शेड उभारले होते. शेतकऱ्यांना सोयीस्कर पद्धतीने माल उतरविता यावा, वाहतूक सुरळीत राहावी आणि व्यापाऱ्यांनाही सुविधा मिळाव्यात, हा या शेडमागील उद्देश होता.

Pune Market Yard Controversy
Katraj-Kondhwa Road Widening: कात्रज–कोंढवा रस्त्यासाठी सक्तीचे भूसंपादन सुरू; प्रशासनाचा कडक पवित्रा

मात्र, प्रत्यक्षात या शेडचा वापर आता अन्य कारणांसाठी होत असल्याचे दिसून येत आहे. शेजारील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर वितरण करण्यासाठी या जागेचा वापर केला जात असून, त्यासाठी बाजार समितीच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर कोणाच्या परवानगीने हा व्यवसाय सुरू झाला, याबाबत प्रशासन मौन बाळगत असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

Pune Market Yard Controversy
Pune Zilla Parishad Water Scarcity Plan Approval: पुणे जिल्हा परिषदेचा 35 कोटींचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर

एकीकडे शेतकऱ्यांना माल उतरविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याची तक्रार वारंवार केली जाते, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या शेडमध्ये खासगी कामकाज सुरू असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ‌‘शेतकऱ्यांच्या नावाखाली सुविधा उभारायच्या आणि नंतर त्या इतरांना वापरायला द्यायच्या, हा प्रकार नेमका कोणाच्या हितासाठी सुरू आहे?‌’ असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Pune Market Yard Controversy
Maharashtra SSC 10th Result: दहावीचा निकाल रखडला; 117 विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप प्रलंबित

बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारलेल्या बटाटा शेडचा वापर अन्य कामांसाठी होणे अत्यंत दुर्दैवी आहे. शेतमालाची आवक वाढत असताना व्यापारी आणि शेतकऱ्यांना जागेअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेडमध्ये गॅस वितरणासारखा खासगी व्यवसाय सुरू असणे योग्य नाही. बाजार समिती प्रशासनाने तातडीने याची चौकशी करून संबंधित अतिक्रमण हटवावे आणि शेडचा वापर मूळ उद्देशासाठीच करावा.

सौरभ कुंजीर, अध्यक्ष, अडते असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news