Pune Fruit Market Rates: पुणे मार्केट यार्डात पपई, सीताफळ महागले; आवक घटल्याने फळांच्या दरात वाढ

पपई किलोमागे ५ रुपये, तर सीताफळाच्या दरात १० टक्क्यांची वाढ; मोसंबीच्या दरात किरकोळ घसरण
Custard Apple
Custard ApplePudhari
Published on
Updated on

पुणे: उत्पादनात घट झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात पपईची आवक अद्याप रोडावलेलीच आहे. त्यातच अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पपईला मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने पपईच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.

Custard Apple
Pune Market Yard Vegetable Rates: पुणे मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक वाढली; पालेभाज्यांचे भाव स्थिर, पुदिना महागला

यंदा पावसाने जूनपर्यंत ओढ दिल्याने सीताफळाचा हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे बाजारातील सीताफळाची आवक अद्याप अपेक्षेपेक्षा कमी आहे. दुसरीकडे, श्रावणातील उपवासामुळे सीताफळाला चांगली मागणी असल्याने त्याच्या दरातही दहा टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

Custard Apple
Shravan Sabudana Bhagar Rates: श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी; शेंगदाणा, साबुदाणा आणि भगर महागली

मोसंबीची आवक मात्र मागणीच्या तुलनेत अधिक असल्याने तिच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. उर्वरित फळांची आवक आणि मागणी स्थिर असल्याने त्यांचे दर टिकून असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Custard Apple
Pune Fish Rates: श्रावणात मांसाहाराला ब्रेक; मासळीच्या दरात ५० टक्के घट, चिकनही स्वस्त

रविवारी (दि. १६) लिंबू १००० ते ११०० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्रा ४ ते ५ टन, डाळिंब १४० ते १५० टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ७ ते ८ गाड्या, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू १००० डाग, पेरु ४०० ते ५०० क्रेट, सीताफळ ३ ते ४ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.

Custard Apple
Pune BSNL 700 Towers: पुण्यात BSNLचा नेटवर्क बूस्टर! ७०० टॉवर्सचे अपग्रेडेशन; नेटवर्क नसतानाही चालणार सॅटेलाईट मोबाईल

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ४०० ते १२००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२६० (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (१० किलो) : १५०-५५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-१३०, आरक्ता : २५-८०, गणेश : १०-३०, कलिंगड : ८-१०, खरबूज : १५-३०, पपई : १५-४०, चिक्कू (दहा किलो) : २००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१२०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००, सफरचंद (१० ते १३ किलो) : १६०० ते २१००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news