Market Update
हिरव्या, टपोर्‍या दाण्यांचा मटार महागला; मार्केट यार्डात अवघ्या 3 टेम्पोमधून मटारची आवकPudhari

Pune Market Update: हिरव्या, टपोर्‍या दाण्यांचा मटार महागला; मार्केट यार्डात अवघ्या 3 टेम्पोमधून मटारची आवक

पावसामुळे हिमाचल प्रदेश येथून आवक घटली
Published on

पुणे: उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्याचा परिणाम पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात होणार्‍या मटारच्या आवकेवर झाला आहे. पावसामुळे हिमाचल प्रदेश येथून होणारी मटारची आवक घटली आहे.

बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने त्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी बाजारात मटारच्या दहा किलोला 1300 ते 1400 रुपयांचा भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात एक किलो मटारची 180 ते 200 रुपयांना विक्री सुरू आहे. (Latest Pune News)

Market Update
Pune Bridge Collapse: 32 वर्षांपूर्वीचा जुना पूल; पाच दिवसांपूर्वीच झाली नवीन पुलाची वर्कऑर्डर!

रविवारी (दि. 15) बाजारात राज्यासह परराज्यातून 90 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. यामध्ये, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात घेवडा विक्रीसाठी बाजारात आला. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश व तामिळनाडू येथून हिरवी मिरची सुमारे 18 ते 20 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, मध्य प्रदेश येथून गाजर 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश 3 टेम्पो मटार, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 8 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 40 ते 42 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 550 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार पेटी, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंग 100 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांद्याची सुमारे 70 ते 75 टेम्पो इतकी आवक झाली.

दर्जेदार पालेभाज्या खाताहेत भाव

पावसामुळे नुकसान झाल्याने मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक सलग दुसर्‍या आठवड्यात कमी झाली आहे. मात्र, दर्जाहिन, भिजलेला माल आणि वाढलेल्या भावामुळे नागरिकांनी पालेभाज्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात करडई, मुळे, कांदापातच्या भावात जुडीमागे प्रत्येकी 5 रुपये, तर अंबाडी, चुका आणि पुदीनाच्या भावात 4 रुपयांनी घट झाली आहे.

Market Update
Rain Alert: कोकण, विदर्भात 20 जूनपर्यंत मुसळधार

मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 15) कोथिंबिरीची सुमारे 75 हजार जुडी तर मेथीची 20 हजार जुडींची आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. नेहमीच्या तुलनेत जवळपास निम्मीच आहे. पुढील काही दिवस आवक कमी राहण्याचा अंदाज व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news