

पुणे: प्रत्येक विभागात असलेल्या हवेच्या दाबांप्रमाणे सध्या पाऊस पडत असून 20 जूनपर्यंत कोकण अन् विदर्भात मुसळधार, मध्यमहाराष्ट्रात मध्यम तर मराठवाड्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात आगामी पाच दिवस फक्त कोकण आणि विदर्भातच मुसळधार पावसाचा अंदाज कोकणात 16 ते 21 जूनपर्यंत अतिमुसळधारेचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील अलर्ट क्षीण झाले आहेत. त्यामुळे या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. (Latest Pune News)
फक्त घाट माथ्यावर पावसाचा जोर राहिल. विदर्भात 17 ते 19 पर्यंत मुसळधार तर 20 आणि 21 रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे.
मान्सून अजूनही मुंबई, पुणे मुक्कामी...
मान्सून 26 मेपासून मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागातच अडखळला आहे. रविवारी 15 जून रोजी तो विदर्भ आणि गुजरातकडे प्रस्थान ठेवणार होता. मात्र तसे झाले नाही गत वीस दिवसांपासून मान्सून याच भागात आहे.
24 तासांत कोकणात झालेला पाऊस..(मि.मी.)
मंडणगड (रत्नागिरी) 250,वाकवली (रत्नागिरी) 200 सावर्डे ( रत्नागिरी) 109; माणगाव (रायगड) 170, श्रीवर्धन (रायगड) 150, पवारवाडी 150, म्हसळा 140 सुधागड पाली, पोलादपूर, लांजा 130, दापोली 120,रत्नागिरी 110,खेड , चिपळूण 90, मुरुड, मालवण, गुहागर, महाड, संगमेश्वर देवरूख 80