Pune Mango Market: पुणे बाजारात आंध्र व उत्तर प्रदेशातील आंब्यांची मोठी आवक; दशहरी, लंगडा, चौसा गाजताहेत

मान्सून लांबल्याने आंबाप्रेमींची मागणी कायम; विविध राज्यांतील गोड आणि रसाळ आंब्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद
Mango
MangoFile Photo
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: राज्यासह शहरात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप तो सक्रिय न झाल्याने पुणेकरांचा आंबा खरेदीकडील ओढा कायम आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि कर्नाटकनंतर आता आंध्र प्रदेशासह उत्तर प्रदेशातील आंब्यानी बाजार गाजवण्यास सुरुवात केली आहे. आंध्र प्रदेशातील नीलम, तोतापुरी आणि बदाम आणि उत्तर प्रदेशातील दशहरी, लंगडा आणि चौसा या लोकप्रिय जातीही पुण्याच्या बाजारात दाखल झाल्याने आंबाप्रेमींना दक्षिण ते उत्तर भारतातील विविध चवींचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे.

Mango
Pune Porsche Accident Bail Cancellation: कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरण; विशाल अगरवालचा जामीन रद्द करण्याची मागणी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात आंध्र प्रदेशातील श्रीनिवासपूर, तर उत्तर प्रदेशातील सहारंगपूर, बिजनौर, देहराडून, मेरठ, लखनऊ, मलियाबाद, मुरादाबादमधून आंबा दाखल होऊ लागला आहे. आंध्र प्रदेशातून जवळपास दहा टन, तर उत्तर प्रदेशातून 20 ते 22 क्रेटसच्या नऊ आणि पाच ते आठ किलो बॉक्सच्या पाच गाड्यांची आवक होत आहे, तर उत्तर प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आंब्यांचा दर्जा आणि प्रतवारी चांगली असल्याने ग्राहकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही प्रदेशांतील आंब्याचा हा हंगाम जुलैअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आंध्र प्रदेशातील आंब्याचे अडतदार रोहन उरसळ आणि उत्तर प्रदेशातील आंब्याचे अडतदार सत्यजित झेंडे यांनी दिली.

Mango
Marathi Film Corporation Membership Voting Rights: मराठी चित्रपट महामंडळाचा मोठा निर्णय; ४५ हजार सभासदांना मतदानाचा हक्क

दशहरी

  • उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लागवड; दशहरी गावाच्या नावावरून आंब्याला नाव मिळाले.

  • आकाराने उभट व निमुळता तसेच गर गडद केसरी रंगाचा आणि चवीला अत्यंत गोड असतो.

  • दरवर्षी १० ते १५ जूनदरम्यान आवक सुरू; हंगाम साधारण दीड ते पावणेदोन महिने चालतो.

  • घाऊक दर (२० ते २२ किलो क्रेटस) : 800 ते 1200. (5 ते 7 किलो पेटी) ४०० ते ६०० रुपये.

  • किरकोळ दर (प्रतिकिलो) 70 ते 90 रुपये

लंगडा

  • काशी आणि वाराणसी परिसरात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.

  • जून ते जुलैदरम्यान बाजारात; हंगाम साधारण दीड ते पावणेदोन महिने चालतो.

  • आकाराने गोलसर आणि पिकल्यानंतरही या आंब्याचा रंग हिरवा-पिवळाच राहतो.

  • याचा गर पिवळसर रंगाचा असून, चवीला गोड आणि रसाळ असतो.

  • घाऊक दर (२० ते २२ किलो क्रेटस) : 800 ते 1200. (5 ते 7 किलो पेटी) ४०० ते ६०० रुपये.

  • किरकोळ दर (प्रतिकिलो) 70 ते 90 रुपये

Mango
Pune Water Supply Crisis: पुण्यात पाणीपुरवठा विस्कळीत; कमी दाबामुळे नागरिकांची तीव्र नाराजी

चौसा

  • गोलसर आणि उभट तसेच दशहरी, लंगडापेक्षा अधिक गोड आणि रसदार मानला जातो.

  • जुलै महिन्यापासून आवकला सुरुवात; हंगाम साधारण एक महिना चालतो.

  • बिहार आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांमध्ये या आंब्याला विशेष पसंती आहे.

  • भडक पिवळ्या रंगामुळे हा आंबा सहज ओळखला जातो.

  • उत्तर प्रदेशातील हरदोईचा चौसा आंबा विशेष प्रसिद्ध आहे.

  • बाजारातील घाऊक दर (२० ते २२ किलो क्रेटस्) : 15०० ते 18०० रुपये.

  • किरकोळ दर (प्रतिकिलो) 100 ते 120 रुपये

तोतापुरी

  • पोपटाच्या चोचीसारखा आकार असल्यामुळे याला तोतापुरी हे नाव पडले आहे.

  • आकाराने मोठा व लांबट तसेच हिरवा असलेला हा आंबा चव आंबट-गोड अन्य आंब्याच्या तुलनेत कमी गोड असतो.

  • कच्च्या तोतापुरीचा वापर चटणी, लोणचे आणि पन्हे तयार करण्यासाठी केला जातो.

  • व्यावसायिक वापरासाठी हा विशेष लोकप्रिय असून, प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठी मागणी असते.

  • घाऊक दर (प्रतिकिलो) 20 ते 30 रुपये. किरकोळ दर (प्रतिकिलो) 40 ते 50 रुपये.

Mango
Lohagad Case: लोहगडावर धक्कादायक खून उघड; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलून संपवल्याचा आरोप

नीलम

  • 'नीलम' हे नाव नीलम नदीच्या परिसराशी संबंधित मानले जाते.

  • इतर आंब्यांच्या तुलनेत हा आंबा अधिक गोड आणि सुगंधी असतो.

  • आकाराने लहान तसेच पिकल्यावर याचा रंग नारंगी-पिवळसर दिसतो.

  • आकर्षक सुगंध आणि चव यामुळे ग्राहकांमध्ये मोठी मागणी असते.

  • उशिरा हंगामात उपलब्ध होणाऱ्या आंब्यांपैकी हा एक मानला जातो.

  • घाऊक दर (प्रतिकिलो) 30 ते 40 रुपये. किरकोळ दर (प्रतिकिलो) 50 ते 60 रुपये.

बदाम

  • लांबट व किंचित चपटा असून, पिकल्यानंतर त्याची साल पिवळसर-सोनेरी रंगाची होते.

  • चव अतिशय गोड व सुगंधी असून, गर मऊ, रसाळ आणि जवळपास तंतुविरहित असतो.

  • गडद पिवळ्या रंगाचा रसाळ गर खाण्यास तसेच रसासाठी उत्तम मानला जातो.

  • हा आंबा साधारणपणे एप्रिल ते जुलैदरम्यान बाजारात उपलब्ध असतो.

  • घाऊक दर (प्रतिकिलो) 25 ते 35 रुपये. किरकोळ दर (प्रतिकिलो) 45 ते 55 रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news