Pune : ओल्या कचर्‍यामुळे मुख्य रस्ता होतोय तेलकट..

Pune : ओल्या कचर्‍यामुळे मुख्य रस्ता होतोय तेलकट..

कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : आपला परिसर स्वच्छ राहावा, यासाठी आरोग्य विभागाकडून सकाळपासून कामाला सुरुवात होते ते रात्री उशिरापर्यंत काम चालू असते. कचरा गोळा करणे, रस्त्याची साफसफाई करणे, नालेसफाई अशी विविध कामे विभागाकडून केली जातात. हा कचरा मोठ्या वाहनांमध्ये छोट्या वाहनांतून टाकून डम्प करत असतात. यातील ओल्या कचर्‍यामुळे रस्ता तेलकट होत असल्याचे चित्र कर्वेनगर भागात पाहायला मिळत आहे.

वारजे जकात नाका, कर्वेनगर भागात कचरा गोळा करून कर्वेनगर येथील मुख्य चौकातील वडारवस्तीजवळील जय बजरंग सभागृह येथे मुख्य रस्त्यावर आणला जातो. येथून पालिकेच्या मोठ्या आकाराच्या ट्रकमध्ये टाकण्यात येतो. छोट्या वाहनातून आणलेला कचरा मोठ्या वाहनात टाकताना रस्त्यावर उतरवला जातो मग पुढे मोठ्या वाहनात टाकला जातो. ओला कचरा असल्याने रस्त्यावर तेलकट पाणी रस्त्यावर पडते. रस्त्यावर पडलेला कचरा पुन्हा उचलला जातो. परंतु, रस्त्यावरील पाणी साफ करणे तत्काळ शक्य नसल्याचे दिसून येते. कचर्‍याचे मुख्य रस्त्याऐवजी अन्य रस्त्यावर डंपिंग करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगताप यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news