Pudhari Maha Misal Mahotsav Season 5: 'पुढारी’चा महा मिसळ महोत्सव सीझन-5, कधी?कुठे?

7 आणि 8 मार्च 2026 रोजी पुण्यात मिसळप्रेमींना लज्जतदार मिसळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेण्याची संधी
Maha Misal Season 5
Maha Misal Season 5Pudhari
Published on
Updated on

पुणे: येत्या शनिवारी व रविवारी ‌‘पुढारी‌’ माध्यम समूहाचा आगळावेगळा ‌‘महा मिसळ सीझन-5‌’ नाहटा लॉन्स, सिंहगड रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. समस्त खवय्ये पुणेकर नागरिक यांच्यासाठी अत्यंत आवडता असणारा हा महा मिसळ महोत्सव गेली चार वर्षे ‌‘पुढारी‌’चे आणि पुण्याचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्‌‍य बनला आहे. त्यामुळे पुणेकर मिसळप्रेमी आणि स्टॉल व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे.

Maha Misal Season 5
Vadgav Nimbalkar Bhendi Cultivation: भेंडी पिकामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ; बाजारभाव उत्साही

विविध चविष्ट, लज्जतदार, चटकदर, प्रसिद्ध मिसळचे स्टॉल्स या महोत्सवात असल्याने मिसळप्रेमींना हे दोन दिवस आपला सकाळचा नाष्टा, दुपारी, संध्याकाळी आपल्या परिवारासोबत झणझणीत, तर्रीबाज, चवदार मिसळचे अनेक वेगवेगळे प्रकार मनमुराद खाण्याची संधी मिळणार आहे. यासोबत काही स्टॉल्सवर काही गोड पदार्थ, थंड ताक, आईस्क्रीम, गरम चहा, कॉफी यांचाही आस्वाद घेता येईल.

Maha Misal Season 5
Walhe Ambajichiwadi Water Shortage: पिण्याच्या पाण्याचा टंचाई प्रश्न; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

याबरोबरच या महोत्सवात सांस्कृतिक, संगीतमय कार्यक्रम सादर होणार असल्याने आपल्या वेगवेगळ्या चविष्ट, लज्जतदार आवडत्या मिसळचा स्वाद घेत पुणेकरांना या स्वरमधुर कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. या मिसळ महोत्सवात प्रत्येकी फक्त वीस रुपये प्रवेश शुल्क आहे.

Maha Misal Season 5
MASAP Dubara Voting 2026-2031: टपालाने न मिळालेल्या मतपत्रिका दुबार मतदानातून मिळवता येणार

तरी मिसळप्रेमी पुणेकरांनी मार्च महिन्यातील पहिला शनिवार, रविवार महा मिसळ महोत्सवास भेट देण्यासाठी आजच राखून ठेवावा, असे आवाहन दैनिक ‌‘पुढारी‌’च्या वतीने करण्यात येत आहे. या महा मिसळ महोत्सवास मुख्य प्रायोजक माणिकचंद ऑक्सिरीच, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी, एज्युकेशन पार्टनर सूर्यदत्ता ग््रुाप ऑफ इन्स्टिट्यूटस, आईसक्रीम पार्टनर हँग्यो या प्रायोजकांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Maha Misal Season 5
Pune Airport Domestic Passengers 2025: पुणे विमानतळावर 2025 मध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या 1 कोटी 5 लाखांवर पोहोचली

‌‘पुढारी‌’ आयोजित पुढारी महा मिसळ महोत्सव पुणे-2026 सीझन-5

महा मिसळ महोत्सव कधी व कुठे?

कधी: शनिवार 7 मार्च व रविवार 8 मार्च 2026

कुठे: नाहटा लॉन्स, वीर बाजी पासलकर चौक, वडगाव पुलाच्या सिग्नलच्या अलीकडे, सिंहगड रोड, पुणे.

वेळ: सकाळी 8.30 ते रात्री 10 पर्यंत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news