Pune LPG Home Delivery Rule: गॅस सिलिंडर फक्त घरपोच; 96 तासांत वितरण बंधनकारक

एजन्सीतून थेट सिलिंडर देण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
LPG
LPGPudhari
Published on
Updated on

पुणे: घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण आता केवळ घरपोच पद्धतीने करण्यात येणार असून, गॅस एजन्सी, गोदाम किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलिंडर देण्यास बंदी घालण्यात आली आहे. कुठेही रांगा लावून गॅस सिलिंडर देऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तास म्हणजेच चार दिवसांत सिलिंडर ग््रााहकांच्या घरी पोहोचवणे बंधनकारक केले आहे. तसेच, गॅस एजन्सीसमोर गर्दी झाल्यास पोलिस प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

LPG
PDCC Bank Clerk Result: पीडीसीसी बँकेच्या क्लार्क भरतीचा निकाल लवकरच जाहीर

घरगुती गॅस सिलिंडर वितरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 16) डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या आणि गॅस एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर ‌‘गॅस सिलिंडरचे वितरण फक्त ओटीपीद्वारेच 96 तासांच्या आत घरपोच करण्यात येईल,‌’ असा स्पष्ट उल्लेख असलेले फलक लावावेत, असे तसेच, गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन रिफिलिंगची क्षमता वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

LPG
Bhimashankar VIP Darshan Controversy: भीमाशंकर मंदिरात व्हीआयपी दर्शन प्रकरण; चौकशीचे आदेश

गॅस सिलिंडरची दररोजची मागणी आणि पुरवठ्याची माहिती जिल्हा प्रशासनास कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गॅस एजन्सींनी कोणताही अवैध व्यापार होणार नाही, यासाठी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, असेही सांगण्यात आले. गॅस सिलिंडर वितरणात कोणी अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली.

LPG
Jejuri Industrial Gas Shortage: आखाती युद्धाचा जेजुरी उद्योगांवर फटका; गॅस टंचाईमुळे उत्पादन ठप्प

रविवारी 85 हजार 161 गॅस सिलिंडरचे वितरण

पुणे शहरासह जिल्ह्यात एकूण 38 लाख 23 हजार गॅस कनेक्शन आहेत. एचपी, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या 222 गॅस एजन्सींमार्फत वितरण केले जाते. 15 मार्च रोजी जिल्ह्यात 85 हजार 161 गॅस सिलिंडरचे वितरण केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

LPG
Ujjwala Yojana LPG Misuse: उज्ज्वला योजनेत गॅस गैरवापराचा संशय; टंचाईमुळे नागरिक त्रस्त

गॅस सिलिंडर मिळणार नाहीत, या भीतीमुळे मागणीत तिपटीने वाढ झाली आहे. मात्र, पुढील आठवडाभरात गॅस वितरणाची स्थिती पूर्वपदावर येईल.

महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

तेल व गॅस ऑपरेटर कंपन्या, वितरक व एजन्सींना शासनाने निर्धारित केलेल्या धोरणे व मार्गदर्शक सूचनांनुसारच गॅस, इंधनाचे वितरण करावे. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी गॅसचा योग्य आणि नियमानुसार पुरवठा होणे आवश्यक आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे ही सर्व वितरकांची जबाबदारी आहे.

महेश गुप्ता, शहर अध्यक्ष, भाजप व्यापारी आघाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news