

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी बँक) क्लार्क पदाच्या 356 जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच घोषित होणार आहे. त्यादृष्टीने बँकेकडून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) या परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला पत्रान्वये कळविण्यात आल्याची माहिती बँकेकडून मिळाली. त्यामुळे परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे.
बँकेच्या कार्यरत असलेल्या सर्व शाखांमध्ये रिक्त पदांमुळे कामकाजात अधिक गतिमानता आणण्यासाठी परीक्षेद्वारे क्लार्क पदाच्या जागा भरण्याचा निर्णय तत्कालीन संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे 356 पदांसाठी लेखी परीक्षा झालेली आहे. बँकेच्या दीर्घकाळ लांबलेल्या या परीक्षेच्या निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. आता मात्र हा निकाल एमकेसीएल एजन्सीकडून लवकरच घोषित होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यात पीडीसीसी बँक ही वार्षिक सुमारे 27 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी एक अग््रागण्य बँक आहे.
पुणे जिल्ह्यात बँकेच्या 294 शाखा कार्यरत आहेत. शेतकऱ्यांसह ग््रााहकांसाठी बँकेकडून विविध कर्ज योजना राबविल्या जातात. त्यामध्ये पीक कर्जासह साखर कारखान्यांना देण्यात येणारे कर्ज, शैक्षणिक, व्यावसायिक कॅश क्रेडिट, ग््रााहकोपयोगी वस्तू, औद्योगिक, वाहन, सोने तारण, गृहकर्ज आदींचा समावेश आहे. रिक्त जागांच्या पदभरतीनंतर बँकेच्या दैनंदिन कामाचा वेग वाढून योजना अंमलबजावणीलाही गती मिळणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.