

पंचवटी : पतीपासून विभक्त होऊन लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याचा राग आल्याने प्रियकराने चार वर्षीय मुलाचे सिलेंडर डोके आपटून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटीतील कृष्ण नगर भागात ही घटना घडली असून वेदांश विरभद्र काळे (४) असे या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.४) प्रियकराला अटक करून त्याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक महिती अशी, लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळची महिला पल्लवी विरभद्र काळे हिला दोन मुली व एक मुलगा असे तीन अपत्य असून गेल्या सात महिन्यांपासून पल्लवी पतीतून विभक्त राहत होती. तिचे लातूर येथील महेश कुंभार याच्याबरोबर प्रेम जुळल्याने महेशसोबत पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील कृष्ण नगर येथे खोली घेऊन ती राहत होती.
रविवारी (दि.०१) रात्री अकरा वाजता घरात प्रियकर महेश कुंभार मुलगा वेदांशला चपाती खाऊ घालत होता. त्यावेळी वेदांशने उलटी केली. त्याचा राग आल्याने महेशने वेदांशला चापट मारली व त्याचे डोके गॅस सिलिंडरवर आपटले. मोठी मुलगी समृद्धीने मामाने पिल्याला खूप मारल्याचे सांगितल्याने पल्लवी महेशला ओरडली. तर वेदांशला बेदम मारहाण झाल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे प्रकृती गंभीर असल्याने त्याला रात्री बसने पुणे जिल्ह्यात कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर महेश याला पंचवटीतील कृष्ण नगर येथून अटक केली.