पुणे : मोबाईलचा हॉटस्पॉट न दिल्याने कोयत्याने वार करुन निघृण खून

Pune Crime | हडपसर परिसरातील घटना
Old woman killed by stabbing with sharp weapon in Sanglit
हॉटस्पॉट न दिल्याने कोयत्याने वार File Photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गृहकर्ज मिळवून देण्याची एजन्सी चालविणाऱ्या एका व्यक्तीचा टोळक्याने कोयत्याने डोक्यात सपासप वार करून निघृण खून केला. मोबाईलचे हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

(Pune Crime)

वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर सोसायटी, सासवड रोड, हडपसर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मयूर भोसले (वय २०, रा. वेताळबाबा वसाहत) याला अटक केली असून, त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वासुदेव यांचे बंधू विनायक कुलकर्णी (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि.१) मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या उत्कर्षनगर सोसायटीच्या समोरील फुटपाथवर सासवड रोड येथे घडली. वासुदेव कुलकर्णी हे गृहकर्ज मिळवून देण्याबाबतची एजन्सी चालवत होते. शनिवार पेठेत त्यांचे ऑफिस आहे. रविवारी (दि.१) ऑफिसला सुटी असल्यामुळे वासुदेव घरीच होते.

रात्री साडेदहा वाजता सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर ते शतपावली करण्यासाठी नेहमीप्रमाणे बाहेर पडले. सोसायटी समोरील फुटपाथवर सासवड रोडकडे ते थांबले असताना, चौघा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी वासुदेव यांच्याकडे मोबाईल हॉटस्पॉटची मागणी केली. वासुदेव यांनी त्यांना नकार दिला.

या कारणातून त्यांच्यात वाद झाला असता, आरोपींनी वासुदेव यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ला एवढा भयानक होता की, वासुदेव यांचा चेहरा छिन्नविच्छिन्न झाला होता. वासुदेव रक्ताच्या थारोळ्यात पदपथावर पडले होते. एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वासुदेव यांच्या मोबाईलवरून त्यांच्या घरी फोन केला.

उपचारासाठी वासुदेव यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. चौघा आरोपींना पोलिसांनी खून झाल्यापासून काही तासांत अटक केली.

मोबाईलचे व्हॉटस्पॉट दिले नाही म्हणून 66 झालेल्या वादातून आरोर्पीनी वासुदेव कुलकर्णी यांचा खून केला. गुन्हा दाखल होताच, काही तासांत सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर,

Old woman killed by stabbing with sharp weapon in Sanglit
सोलापूर : गड्डा यात्रेत दिवसाढवळ्या बिहारी तरूणाचा खून; पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना घेतले ताब्यात
Old woman killed by stabbing with sharp weapon in Sanglit
Monsoon Update | राज्यावर मान्सून मेहरबान!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news